शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार, १३ महिन्यांच्या राजकीय मोहिमेची घोषणा, 'या' मुद्यांवर रान उठविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 11:55 IST

एप्रिलमध्ये काँग्रेसचे गुजरातमध्ये अधिवेशन

राम मगदूम/प्रकाश बेळगोजीबेळगाव : संविधानावरील कथित हल्ला तसेच महागाई आणि भ्रष्टाचाराबद्दल लोकांच्या चिंता यासारखे मुद्दे उपस्थित करून सरकारविरोधात रान उठविण्यासाठी काँग्रेसने गुरुवारी पदयात्रेसह १३ महिन्यांच्या राजकीय मोहिमेची घोषणा केली. पक्षात मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात येणार असून ही प्रक्रिया लगेच सुरू होईल आणि पुढील वर्षभर चालेल.काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या विस्तारित काँग्रेस कार्यकारिणीच्या म्हणजेच नव सत्याग्रह बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले. त्यातील एक महात्मा गांधींवर आणि दुसरा राजकीय होता. पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे, माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस जयराम रमेश आणि के. सी. वेणुगोपाल यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते "ऐतिहासिक" बैठकीला उपस्थित होते. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जयराम रमेश आणि पवन खेरा उपस्थित होते.के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, २०२५ हे वर्ष संघटनेच्या सुधारणेचे वर्ष असणार आहे. नेतृत्व करण्याची क्षमता आणि उत्तरदायित्व या दोन गुणाच्या आधारावर पक्षात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात येणार आहेत.

जय बापू, जय भीम आणि जय संविधान अभियान२७ डिसेंबर २०२४ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत 'जय बापू, जय भीम आणि जय संविधान अभियान' असेल . ते गाव, ब्लॉक, जिल्हा आणि राज्याराज्यांत राबविण्यात येईल. या अभियानाचे नेतृत्व राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व करणार असल्याचेही वेणुगोपाल यांनी सांगितले. संविधानावरील हल्ला, संविधानाच्या मूल्यांचा ऱ्हास, महागाई आणि भ्रष्टाचार यासारखे लोकांचे प्रश्न या अभियानाद्वारे मांडणार आहोत, २६ जानेवारीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी महु येथे विशाल रॅलीने त्याच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होईल. असेही ते म्हणाले.

एप्रिलमध्ये काँग्रेसचे गुजरातमध्ये अधिवेशनमहात्मा गांधीजींच्या विचारांवर पंतप्रधान, गृहमंत्री,भाजप व आरएसएसकडून हल्ले होत आहेत. यामुळे गुजरातमध्ये एप्रिल महिन्यात काँग्रेसचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तब्बल चार तास बैठकया बैठकीला विस्तारित कार्यकारिणीचे देशभरातील १३२ सदस्य उपस्थित होते.त्यापैकी ५० जणांनी चर्चेत भाग घेतला. अध्यक्ष खर्गे व राहुल गांधी यांनी सखोल विवेचन केले.तब्बल चार तास ही बैठक चालली.

टॅग्स :Karnatakकर्नाटकbelgaonबेळगावcongressकाँग्रेस