शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:44 IST

दोन दिवसांपूर्वीच ओडिशातील मलकानगिरी जिल्ह्यात 22 माओवाद्यांनी सरेंडर केले आहे.

भुवनेश्वर: ओडिशा पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी ख्रिसमसच्या दिवशी राबवलेल्या मोठ्या संयुक्त कारवाईत CPI (माओवादी) संघटनेचा सेंट्रल कमिटी सदस्य आणि ओडिशातील माओवादी कारवायांचा प्रमुख कमांडर गणेश उइके याला ठार केले आहे. या चकमकीत एकूण चार माओवादी ठार झाले असून, त्यात दोन महिला कॅडरचा समावेश आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्पेशल इंटेलिजन्स विंगकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 23 पथकांचे संयुक्त ऑपरेशन राबवण्यात आले. यात माओवादी कमांडर गणेश उइकेसह चार माओवाद्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला माओवाद्यांचाही समावेश आहे. यातील गणेश उइकेवर 1.1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर होते. उर्वरित तीन ठार माओवाद्यांची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही.

चकमक कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा पोलिसांच्या SOG (स्पेशल ऑपरेशन ग्रुप) ची एक लहान मोबाइल टीम गुम्मा जंगलात शोधमोहीम राबवत होती. याच दरम्यान त्यांचा माओवाद्यांशी सामना झाला. चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. यात चार माओवादी ठार झाले. गणेश उइकेच्या मृत्यूनंतर ओडिशातील माओवादी नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम आणखी तीव्र केली असून, उर्वरित माओवादी कॅडरचा शोध सुरू आहे.

शस्त्रसाठा जप्त

चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून एक रिव्हॉल्व्हर, एक .303 रायफल, एक वॉकी-टॉकी सेट जप्त केला आहे. या कारवाईत सुरक्षा दलाकडील कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या संपूर्ण परिसरात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

आत्मसमर्पणानंतर लगेच कारवाई

ही चकमक शेजारच्या मलकानगिरी जिल्ह्यात 22 माओवाद्यांनी ओडिशाचे डीजीपी वाय. बी. खुराना यांच्यासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर अवघ्या एका दिवसात घडली आहे. त्यामुळे राज्यातील माओवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Major Action: Security Forces Eliminate 4 Maoists in Odisha Forest

Web Summary : Security forces killed four Maoists, including two women, in Odisha's Gumma forest. The deceased included wanted Maoist leaders with substantial bounties. Weapons were seized, and search operations intensified after the encounter. The operation follows recent Maoist surrenders.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीOdishaओदिशा