शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोठी घडामोड; मोदी सरकारमधील एक मंत्र्याचा राजीनामा, राज्यपालपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 13:11 IST

Governor's appointment by Precedent Ramnath Kovind: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधीच विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये एका कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे.

Cabinet Expansion: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधीच विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत (Thawar Chand Gehlot) यांना मंत्रिपदावरून हटवून कर्नाटक राज्याचे राज्यपाल (Governor) बनविण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हे आदेश दिले आहेत. (Precedent Ram nath kovind appoint Governor's of Karnataka, Madhya Paradesh, himachal pradesh and other states.)

Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराची बैठक अचानक रद्द; मोदी रात्रीच शहांना भेटले

 मिझोरामचे राज्यपाल पदी हरि बाबू कमभमपति,  मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी मंगूभाई छगनभाई पटेल, हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

तर मिझोरामचे सध्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना गोव्याचे राज्यपाल, हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांना त्रिपुराचे राज्यपाल, त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांना झारखंडचे राज्यपाल, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांना हरियाणाच्या राज्यपाल पदी नियुक्ती देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गेहलोत यांना हटविण्यात आले आहे. (Thawar Chand Gehlot appointed Governor of Karnataka before modi's Cabinet Expansion)

आजची बैठक रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) निवासस्थानी आज सायंकाळी मोठ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा, राजनाथ सिंह, निर्मला सितारामन, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, प्रह्लाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर हे उपस्थित राहणार होते. परंतू मोदी यांनी काल रात्रीच गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे सचिव बी एल संतोष यांची भेट घेतली. यानंतर हा आजची बैठक रद्द करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीgoaगोवाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारRamnath Kovindरामनाथ कोविंद