केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; आकाश मिसाईल, तीन लाख रोजगार, इथेनॉल उत्पादन वाढविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 05:00 PM2020-12-30T17:00:10+5:302020-12-30T17:01:26+5:30

Modi Cabinet decisions : भूतान आणि भारतामध्ये झालेल्या सहकार्य करारालाही मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. डीआरडीओने बनविलेल्या आकाश मिसाईच्या विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे.

Major decisions of the Union Cabinet; employment to 3 lakh, increase ethanol production | केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; आकाश मिसाईल, तीन लाख रोजगार, इथेनॉल उत्पादन वाढविणार

केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; आकाश मिसाईल, तीन लाख रोजगार, इथेनॉल उत्पादन वाढविणार

Next

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची माहिती देताना सांगितले की, 7,725 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून जवळपास तीन लाख रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठीच्या योजनेला मंजुरी देण्य़ात आली आहे. 


मंत्रिमंडळाने कृष्णपट्टनम आणि तुमकुरूच्या औद्योगिक वसाहतींमध्ये तसेच नोएडामध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक केंद्राला परवानगी दिली आहे. कृष्णपट्टनम बंदरामध्ये 2139 कोटी रुपये खर्चून औद्योगिक क्षेत्राचा विकास केला जाणार आहे. 



 


जावडेकर यांनी सांगितले की, दोन ट्रेड कॉरिडॉर बनविण्यात येणार आहेत. यामुळे मालाची वाहतूक चांगल्या प्रकारे होईल. या कॉरिडॉरला एक्स्प्रेस वे, बंदरे आणि रेल्वेसारख्या सुविधा आहेत, त्या शहरांचाही विकास केला जाणार आहे. याशिवाय मंत्रिमंडळाने एस्टोनिया, पॅराग्वे आणइ डॉनिनिकन संघराज्यामध्ये भारतीय मिशन सुरु करण्यास परवानगी दिली आहे. 




भूतान आणि भारतामध्ये झालेल्या सहकार्य करारालाही मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, इथेनॉलची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. देशाच्या पहिल्या पिढीच्या (1G) इथेनॉलच्या योजनेंतर्गत तांदूळ, गहू, मका, ऊस आदींपासून इथेनॉल बनविण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी केंद्राने 4,573 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. 



पॅरादीप पोर्टसाठी मोदी सरकारने 3000 कोटी रुपये दिले आहेत. याद्वारे जागतिक स्तरावरील बंदर उभारले जाणार आहे. याचबरोबर डीआरडीओने बनविलेल्या आकाश मिसाईच्या विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे. ही मिसाईल भारतीय सैन्याला दिलेल्या मिसाईलपेक्षा वेगळी असणार आहे. या आकाश मिसाईलची रेंज 25 किमी आहे. 



 

 

 

Web Title: Major decisions of the Union Cabinet; employment to 3 lakh, increase ethanol production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.