शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

कोरोनामुळे दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर...

By मोरेश्वर येरम | Updated: December 29, 2020 17:59 IST

प्रजासत्ताक दिनी दरवर्षी भारताच्या लष्करी सामर्थ्याचं, विविध कलाकृतींचं आणि संस्कृतीचं दर्शन संचलनाच्या माध्यमातून केलं जातं.

ठळक मुद्देप्रजासत्ताक दिनाचं संचलन यावेळी केवळ ३.३ किमी अंतराचंकोरोनामुळे संचलनात करण्यात आलेत मोठे बदलप्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यंदा लहान मुलांना सहभागी होता येणार नाही

नवी दिल्लीदेशाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीमध्ये होणाऱ्या संचलन सोहळ्यात यंदा मोठे बदल करण्यात येणार आहेत. कोरोनामुळे संचलनाचे अंतर कमी करण्यात आले आहे. 

प्रजासत्ताक दिनी दरवर्षी भारताच्या लष्करी सामर्थ्याचं, विविध कलाकृतींचं आणि संस्कृतीचं दर्शन संचलनाच्या माध्यमातून केलं जातं. दरवर्षी राजपथ येथून सुरु होणारं संचलन हे दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत होतं. पण यावेळीचं संचलन दिल्लीच्या विजय चौक येथून सुरु होऊन नॅशनल स्टेडियमपर्यंतच होणार आहे. 

यंदाचे संचलन केवळ ३.३ किमीयंदाच्या संचलनाचे अंतर हे निम्म्याहून अधिक कमी करण्यात आलं आहे. दरवर्षी ८.२ किमी इतक्या अंतरावर संचलन केलं जायचं. पण यावेळी हे अंतर ३.३ किमी इतकंच असणार आहे. याशिवाय  हे संचलन पाहण्याची संधी देखील मोजक्या लोकांनाच मिळणार आहे. दरवर्षी राजपथावरील संचलन पाहण्यासाठी १ लाख १५ हजारांपर्यंत नागरिक जमा होतात. पण यावेळी फक्त २५ हजार नागरिकांना या संचलनाला उपस्थित राहता येणार आहे. तिकीट काढून दरवर्षी ३२ हजारांहून अधिक नागरिक उपस्थिती लावायचे, पण यावेळी केवळ ७,५०० लोकांनाच तिकीट काढून सोहळ्याला उपस्थित राहता येणार आहे. 

लहान मुलांचा समावेश नाहीप्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये यंदा लहान मुलांना सहभागी होता येणार नाही. १५ वर्षांवरील विद्यार्थ्यांनाच फक्त या संचलनामध्ये सहभागी होता येईल. शालेय विद्यार्थ्यांना संचलन पाहण्यासाठी केली जाणारी विशेष व्यवस्था देखील यावेळी नसणार आहे. यावेळी उभं राहून संचलन पाहता येणार नाही. जितक्या खुर्च्या उपलब्ध करुन देण्यात येतील तितकेच लोक संचलनाला उपस्थित राहू शकतात. 

संचलनाच्या तुकडीचा आकारही कमीसंचलनात यावेळी कमी तुकड्या सहभागी होणार आहेत. यातही प्रत्येक तुकडीतील जवानांची संख्या कमी करण्यात येणार असून यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं जाणार आहे. दरवर्षी एका तुकडीत १४४ जणांचा समावेश असायचा यावेळी एका तुकडीत केवळ ९६ जण पाहायला मिळतील. संचलनात सहभागी झालेल्या आणि प्रेक्षकांनाही मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे. याशिवाय संचलन सोहळ्याकडे येणाऱ्या प्रवेश आणि गंतव्यद्वारांचीही संख्या वाढविण्यात येणार आहे. 

१५ जानेवारी रोजी होणार रंगीत तालीमप्रजासत्ताक दिनी भारतीय लष्काराची जी तुकडी संचलनात सहभागी होणार आहे. तिच तुकडी सध्या 'आर्मी डे'साठी देखील तयारी करत आहे. १५ जानेवारी रोजी 'आर्मी डे'च्या संचलनानंतर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. संचलनात सहभागी होणाऱ्या सर्व जवानांसाठी कोविड-बायो बबल तयार करण्यात आले आहे. संचलनात सामील होणाऱ्या सर्व जवानांची आरोग्य आणि कोविड चाचणी घेऊन त्यांना आयसोलेट करण्यात आलं आहे. कोविड संबंधिच्या सर्व नियमांचं पालन करण्यात येत आहे.  

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनcorona virusकोरोना वायरस बातम्याIndian Armyभारतीय जवानIndian Army Dayभारतीय सैन्य दिन