शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराला मिळणार ४,९६० MILAN-2T अँटी टँक गायडेड मिसाईल्स; १,११८ कोटींच्या कंत्राटावर स्वाक्षऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 17:16 IST

Bharat Dynamics Limited : पाहा काय विशेष आहे या मिसाईल्समध्ये, भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत संरक्षण मंत्रालायानं केला मोठा करार

ठळक मुद्देभारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत संरक्षण मंत्रालायानं केला मोठा करारमेक इन इंडियाला मिळणार चालना

एकीकडे पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांसोबत सीमेवर तणाव आहे. तर दुसरीकडे भारत सरकार आपली लष्करी ताकदही वाढवण्याचे प्रयत्न करत आहे. दरम्यान, संरक्षण मंत्रालयानं १९ मार्च रोजी डिफेन्स पब्लिक सेक्टर अंटरटेकिंग कंपनी भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत मोठा करार केला आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार ४,९६० MILAN-2T अँटी चॅक गायडेड मिसाईलच्या पुरवठ्याबाबत हा करार करण्यात आला आहे. ही अँटी टँक गायडेड मिसाईल भारतीय लष्कराला सोपवण्यात येणार आहे. हा संपूर्ण करार १,११८८ कोटी रूपयांचा असल्याचंही सांगितलं जात आहे. 

संरक्षण मंत्रालयानंदेखील याबाबत माहिती दिली. MILAN-2T हे मिसाईल भारत डायनॅमिक्स लिमिटेडद्वारे फ्रान्सच्या एका संरक्षण क्षेत्रातील कंपनीकडून मिळालेल्या लायसन्सच्या अंतर्गत विकसित केलं जात आहे. हे मिसाईल भारतीय लष्करात दाखल झाल्यानंतर लष्कराची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. भारत डायनॅमिक्सकडून सर्व ४,९६० MILAN-2T अँटी टँक गायडेड मिसाईल्स मिळण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी लागू शकतो.

MILAN-2T मिसाईलमधील महत्त्वाच्या बाबी

  • MILAN-2T अँटी टँक गायडेड मिसाईल मॅन पोर्टेबल (Infantry) सेकंड जनरेशन ATGM आहे. 
  • स्फोटकांनी भरलेला टँकदेखील नष्ट करण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे. याद्वारे बंकर्सदेखील नष्ट केले जाऊ शकतात. 
  • MILAN-2T अँटी गायडेड मिसाईलची रेंज १८५९ मीटरपर्यंत आहे. हे मिसाईल फ्रान्सच्या MBDA मिसाईल सिस्टमच्या लायसन्स अंतर्गत भारत डायनॅमिक्स लिमिटेडद्वारे तयार करण्यात येणार आहे. 
  • MILAN-2T अँटी टँक गायडेड मिसाईल केवळ जमिनीवरूनच नाही तर व्हेईकल बेस्ड लाँचरमधूनही फायर केलं जाऊ शकतं. 
  • याचा वापर ऑफेन्सिव्ह किंवा डिफेन्स टास्कमध्ये अँटी टँक रोलमध्ये केला जातो. 

मेक इन इंडियाला चालनाMILAN-2T अँटी टँक गायडेड मिसाईल लष्कराच्या ताफ्यात सामिल झाल्यानंतर लष्कराची ताकद अधिक वाढणार आहे. याशिवाय संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया मोहिमेला चालना मिळणार आहे. हा करार आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्रालयानं दिली. 

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागIndian Armyभारतीय जवानGovernmentसरकार