शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
4
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
5
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
6
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
7
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
8
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
9
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
10
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
11
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
12
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
13
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
14
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
15
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
16
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
17
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
18
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
19
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 22:34 IST

बंगळुरूतील दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी न्या. माइकल कुन्नाह यांच्या नेतृत्वावाली तपास आयोग स्थापन केला आहे.

बंगळुरू - आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे विजयी सोहळ्याला गालबोट लागले. या चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेवरून देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणाचे उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश कर्नाटक सरकारने दिले आहेत. त्याशिवाय कर्नाटक सरकारने या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांसह इतर बड्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबन करण्याची मोठी कारवाई केली आहे.

बंगळुरूतील दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी न्या. माइकल कुन्नाह यांच्या नेतृत्वावाली तपास आयोग स्थापन केला आहे. न्या. कुन्नाह या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणार आहेत. त्याशिवाय या घटनेवर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. सरकारने या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. कब्बन पार्क एसीपी, सेंट्रल झोन डीसीपी, अतिरिक्त पोलीस आयुक्त वेस्ट झोन, बंगळुरू पोलीस आयुक्त, स्टेशन हाऊस मास्टर, कब्बन पार्क पोलीस निरीक्षक यांचा समावेश असून या सर्वांना निलंबित करण्यात आले आहे.

माहितीनुसार, सुरक्षेचा हवाला देत पोलिसांनी हा इव्हेंट करण्यात परवानगी दिली नव्हती. त्याशिवाय आरसीबीलाही ४ जूनला कार्यक्रम घेण्यास मनाई केली होती. तरीही या प्रकरणाचे खापर पोलिसांवर फोडण्यात आले असून अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरसीबी, केएससीए आणि इव्हेंट आयोजित करणाऱ्या डिएनए कंपनीच्या प्रतिनिधींना अटक केली आहे. कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करू असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ३ जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा अंतिम सामना खेळला गेला. त्यात पंजाब किंग्स टीमला हरवून पहिल्यांदाच आरसीबीने विजेतेपदावर नाव कोरले. याचाच आनंद साजरा करण्यासाठी ४ जूनला बंगळुरूत विजयी परेड आयोजित केली होती. संध्याकाळी ही विजयी परेड बंगळुरू विधानसभेतून चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत जाणार होती. परंतु रस्त्यावर चाहत्यांची मोठी गर्दी पाहता ही विजयी परेड रद्द करून खेळाडू थेट स्टेडियमला पोहचले. यात खेळाडूंना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी प्रचंड गर्दी केली. त्यातच स्टेडियमबाहेरही मोठी गर्दी झाली. त्यात चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांना आपला जीव गमवावा लागला.  

टॅग्स :Bengaluru Stampedeबंगळुरुमध्ये चेंगराचेंगरीRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरStampedeचेंगराचेंगरीKarnatakकर्नाटक