एनआयएने पाच राज्यात धाड टाकली आहे. तर जम्मू -काश्मीरमधील २२ ठिकाणी शोध मोहिम सुरू केली आहे. दहशतवादी कट रचण्याच्या प्रकरणात एनआयएची ही एक मोठी कारवाई आहे.
दहशतवादी कटाशी संबंधित एका प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात ही कारवाई केली जात आहे. जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला, कुलगाम, अनंतनाग आणि पुलवामा जिल्ह्यात शोधमोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जम्मू आणि काश्मीरला भेट देणार असल्याचे वृत्त आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम, अनंतनाग, पुलवामा आणि बारामुल्ला येथे शोधमोहीम सुरू आहे. अनेक ठिकाणांहून मोबाईल फोन आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. जूनच्या सुरुवातीला एनआयएने जम्मू आणि काश्मीरमध्येच ३२ ठिकाणी छापे टाकले होते.
बिहारमध्ये एनआयएला मोठे यश
बिहारमध्ये एनआयएला मोठे यश मिळाले आहे. एनआयएच्या पथकाने खलिस्तानी दहशतवादी शरणजीतला अटक केली आहे. शुक्रवारी छापा टाकताना त्याला गोपाळपूर येथून अटक करण्यात आली. शरणजीत कुमार उर्फ शनी हा सुवर्ण मंदिरात झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातील आरोपी आहे. तो पंजाबमधील गुरुदासपूर येथील बटाला येथील रहिवासी आहे.