शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
5
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
6
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
7
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
8
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
9
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
10
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
11
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
12
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
13
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
14
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
15
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
16
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
17
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
18
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
19
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
20
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?

एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 23:32 IST

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एअर इंडियाच्या एका विमानाचा मोठा अपघात टळला आहे.

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एअर इंडियाच्या एका विमानाचा मोठा अपघात टळला आहे. हे विमान मुंबईला जाण्यासाठी हैदराबादहून उड्डाण करण्याच्या तयारीत होते, तेव्हाच त्यात तांत्रिक बिघाड आढळून आला. पायलटने तात्काळ विमान धावपट्टीवरच थांबवले आणि उड्डाण रद्द केले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्याच एका विमानाचा मोठा अपघात झाला होता, ज्यात अनेक लोकांचा बळी गेला होता.

पायलटने टेकऑफ रद्द केलेमिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद विमानतळावर विमानाने उड्डाण घेण्यापूर्वीच ते थांबवण्यात आले. पायलटने शेवटच्या काही मिनिटांत विमान थांबवले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने पायलटने टेकऑफ रद्द केले. यामुळे संभाव्य धोका टळला आणि विमानात असलेले सर्व प्रवासी सुरक्षित राहिले. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करत प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली आणि त्या विमानाने प्रवाशांना मुंबईला पाठवण्यात आले.

अहमदाबादमध्ये घडला होता भीषण अपघातगेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये एक भीषण विमान दुर्घटना घडली होती. १२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे फ्लाइट AI-१७१ दुर्घटनाग्रस्त झाले होते. प्राथमिक अहवालानुसार, विमानाचे दोन्ही इंजिन निकामी झाले होते. यामुळे उड्डाण भरल्याच्या काही मिनिटांतच विमान बी.जे. मेडिकल कॉलेजच्या एका इमारतीला धडकले. या विमानात एकूण २४२ लोक होते, त्यापैकी २४१ लोकांचा मृत्यू झाला. एअर इंडियाचे विमान बी.जे. मेडिकल कॉलेजवर आदळल्याने तेथील २२ लोकांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला.

स्फोटासह लागली होती आगएअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलायनर ७८७ विमानाने १२ जून रोजी दुपारी लंडनसाठी उड्डाण केले होते. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून या विमानाने टेकऑफ केले. हे विमान लंडनच्या गॅटविक विमानतळावर उतरणार होते. परंतु, 'टेकऑफ' केल्यानंतर अवघ्या एका मिनिटातच विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमानाला सात हजार किलोमीटरचे अंतर कापायचे असल्याने त्यात एक लाख लिटर इंधन होते. विमान कोसळताच मोठा स्फोट झाला आणि इंधनाला आग लागली. आग इतकी भीषण होती की प्रवाशांना वाचवण्याची संधीच मिळाली नाही.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाTelanganaतेलंगणा