कोचीमध्ये मोठा अपघात, हेलिकॉप्टरचा दरवाजा तुटल्यानं 2 नौसैनिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 02:17 PM2018-12-27T14:17:09+5:302018-12-27T14:17:16+5:30

कोची नेव्हल बेसमध्ये एक मोठा अपघात घडला आहे.

A major accident in Kochi, two helicopter deaths, two naval executions | कोचीमध्ये मोठा अपघात, हेलिकॉप्टरचा दरवाजा तुटल्यानं 2 नौसैनिकांचा मृत्यू

कोचीमध्ये मोठा अपघात, हेलिकॉप्टरचा दरवाजा तुटल्यानं 2 नौसैनिकांचा मृत्यू

केरळ- कोची नेव्हल बेसमध्ये एक मोठा अपघात घडला आहे. हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा तुटून पडल्यानं दोन नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी 11 वाजता कोची नेव्हल बेसमध्ये घडली आहे. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याच्या माहितीनुसार, या अपघातात दोन नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा या दोन्ही नौसैनिकांच्या अंगावर कोसळला आणि अपघातात त्या नौसैनिकांचा मत्यू झाला. या अपघातात आणखी दोन ते तीन नौसैनिक जखमी झाले असून, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.



 

Web Title: A major accident in Kochi, two helicopter deaths, two naval executions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.