शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 16:13 IST

गुजरातमध्ये भिंत कोसळून सात मजूर ठार झाल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे.

Gujarat Wall Collapsed :गुजरातमधूनअपघाताची मोठी घटना समोर आली आहे. शनिवारी गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात भिंत कोसळल्याने अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून मातीचा ढिगारा बाजूला काढण्याचे काम सुरु आहे.

मेहसाणा जिल्ह्यातील कडी तालुक्यातील जसलपूर गावाजवळील एका खासगी कंपनीमध्ये बांधकामाच्या ठिकाणी सात जणांचा मृत्यू झाला आहे.अजूनही ४ ते ५ मजूर अडकल्याची शक्यता आहे. कारखान्यासाठी भूमिगत टाकी बसविण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक माती खचल्याने त्या जागेवर काम करणारे मजूर  मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले.  टाकी खोदणाऱ्या मजुरांवर मोठ्या प्रमाणात माती पडली आणि ते खाली अडकले गेले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. रुग्णवाहिका आणि पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आतापर्यंत मातीच्या ढिगाऱ्याखालून सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसलपूर गावात अनेक कामगार एका कारखान्यासाठी भूमिगत टाकी खोदत असताना माती खचली. या ढिगाऱ्याखालून सात मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही तीन ते चार मजूर मातीखाली गाडले असण्याची शक्यता आहे. स्टील आयनॉक्स स्टेनलेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत झालेल्या अपघातानंतर जेसीबीच्या सहाय्याने माती काढण्यात येत आहे. कंपनीत सध्या बांधकाम सुरू आहे. कामगार टाकी खोदत असताना अचानक माती खचली.

दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना राबविण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, पीडितांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातAccidentअपघातPoliceपोलिस