पॅन-आधार जोडणीवर निकाल राखून ठेवला

By Admin | Updated: May 5, 2017 03:30 IST2017-05-05T03:30:30+5:302017-05-05T03:30:30+5:30

१ जुलैपासून प्राप्तिकर रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार क्रमांक यांची परस्परांशी जोडणी सक्तीची करण्यासाठी

Maintained the result on a pan-base connection | पॅन-आधार जोडणीवर निकाल राखून ठेवला

पॅन-आधार जोडणीवर निकाल राखून ठेवला

नवी दिल्ली : १ जुलैपासून प्राप्तिकर रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार क्रमांक यांची परस्परांशी जोडणी सक्तीची करण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात केलेल्या दुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेस आव्हान देणाऱ्या याचिकांवर गेले चार दिवस सुरु असलेली घणाघाती सुनावणी संपल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निकाल राखून ठेवला. न्यायाधीशांनी उन्हाळी सुटीतही काम करावे, असे आवाहन सरन्यायाधीशांनी केल्याने कदाचित हा निकाल सुटीत दिला जाऊ शकेल.

Web Title: Maintained the result on a pan-base connection