Aastha Singh Ritu Tripathi Rishi Mishra HDFC bank viral video: 'मैं ठाकूर हूँ' म्हणणाऱ्या महिला बँक कर्मचारी आस्था सिंह यांचा एक व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडीओत असा दावा करण्यात आला होता की, ती महिला बँकेतील ग्राहकाशी उद्धटपणे बोलत आहे. या व्हिडीओनंतर आस्था सिंह यांनी स्पष्टीकरण देत, व्हिडीओ जुना असल्याचे सांगितले होते. तसेच, व्हिडीओ जाणीवपूर्वक अर्धवट व्हायरल करण्यात आला म्हणत, ज्यांनी व्हिडीओ व्हायरल केला त्या रितू त्रिपाठी आणि ऋषी मिश्रा यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले. यावर आता रितू त्रिपाठी आणि ऋषी मिश्रा यांची प्रतिक्रिया आली आहे. अपमानही आम्हीच सहन करायचा आणि नंतर मानहानीचा खटला आमच्यावर केला जाणार, याचा अर्थ ब्राह्मण असणं पाप मानायला हवे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
ब्राह्मण असणं पाप आहे असंच मानलं पाहिजे..
पत्नीचा आणि बहिणीचा छळ पाहिल्यानंतर बँकेत पोहोचलेले ऋषी मिश्रा भावुक झाले आणि म्हणाले की, अपमानही आम्हीच सहन करायचा आणि नंतर मानहानीची तक्रारही आमच्याविरोधात केली जाणार. ब्राह्मण असणं पाप आहे असं मानायला हवं. ब्राह्मण असल्याने हा छळ केला जात आहे. ऋषी म्हणाले की त्यांनी कोणताही व्हिडिओ व्हायरल केला नाही. जर त्यांना करायचे असते तर त्यांनी ७ जानेवारी रोजीच तसे केले असते. ऋषी यांच्या मते सीसीटीव्ही फुटेज पाहून हे स्पष्ट होईल की प्रथम कोणी गैरवर्तन केले.
रितू त्रिपाठीचा दावा काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रितू त्रिपाठी यांनी खुलासा केला आहे की, आस्था सिंह यांनी तिच्यावर आणि तिच्या पतीवर आरोप केल्यापासून ऋषी मिश्रा यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आस्था जे बोलत आहे ते खोटे आहे; सर्व काही बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. जर माझ्या पतीला काही झाले तर त्यासाठी आस्था सिंहच जबाबदार असेल. रितू यांनी जनसुनवाई पोर्टलवर या संदर्भात तक्रारही दाखल केली आहे.
बँकेत रात्री ११ वाजेपर्यंत थांबवलं जायचं...
रितू त्रिपाठी यांनी असेही सांगितले की, त्या ६ नोव्हेंबर २०२४ रोजी बँकेत रुजू झाल्या, परंतु तेथील वातावरण चांगले नव्हते. रितू यांनी बँकेला सांगितले की त्यांना एक लहान मुलगी आहे, परंतु तरीही तिला रात्री ११ वाजेपर्यंत थांबवले जात असे. ब्रँच मॅनेजर सुमित सिंह त्यांना केबिनमध्ये बोलवून नोकरी सोडण्याचा सल्ला द्यायचा. जेव्हा रितूने नकार दिला तेव्हा तिच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणला गेला. या मानसिक तणावामुळे तिने नोकरी सोडली.
आस्था सिंह यांचे म्हणणे काय?
आस्था सिंह यांनी आपल्या स्पष्टीकरणाच्या व्हिडीओत असा दावा केला की, रितू त्रिपाठींनी बँकेत राजीनामा दिला होता. त्या मुद्द्यावरून दोघींमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर ऋषी मिश्रा बँकेत आले आणि त्यांनी आस्थाला धमकावत शिवीगाळ केली. तसेच जातीवाचक गोष्टीही बोलल्या गेल्या. व्हायरल करण्यात आलेला व्हिडीओ केवळ बदनामीसाठी आहे आणि त्याविरोधात आस्था मानहानीचा दावा ठोकणार आहेत.
Web Summary : Viral bank video leads to accusations and counter-accusations. Rishi Mishra questions if being Brahmin is now considered a sin, following a dispute involving HDFC bank employees and alleged harassment claims.
Web Summary : वायरल बैंक वीडियो से आरोप-प्रत्यारोप। ऋषि मिश्रा ने सवाल उठाया कि क्या ब्राह्मण होना अब पाप माना जाता है, एचडीएफसी बैंक कर्मचारियों और कथित उत्पीड़न के दावों से जुड़े विवाद के बाद।