शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मोइत्रांचे व्यवहार अनैतिक, त्यांची खासदारकी रद्द करा; नैतिकता समितीच्या बैठकीत प्रस्ताव ६-४ मतांनी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 07:13 IST

नैतिकता समितीच्या बैठकीत महुआ मोइत्रा यांचे व्यवहार व आचरण अनैतिक मानण्यात येऊन त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करण्यात आली.

- संजय शर्मानवी दिल्ली : पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खा. महुआ मोइत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे. नैतिकता समितीच्या गुरुवारच्या बैठकीत महुआ मोइत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या अहवालाचा प्रस्ताव ६-४ मतांनी मंजूर करण्यात आला. हा अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे आज सुपूर्द केला जाणार आहे.

नैतिकता समितीच्या बैठकीत महुआ मोइत्रा यांचे व्यवहार व आचरण अनैतिक मानण्यात येऊन त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करण्यात आली. ५०० पानांच्या या अहवालात समितीने महुआ मोइत्रा यांच्या विरोधात कठोर शिक्षा देण्याची शिफारस केली आहे. हा अहवाल समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत.

आरोप सिद्ध होण्याआधीच...तृणमूलने आपल्या पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा यांचे समर्थन करत म्हटले आहे की, त्यांना केंद्राकडून त्रास दिला जात आहे. मोइत्रा यांच्या विरोधात आरोप सिद्ध होण्याआधीच संसदेची एखादी समिती त्यांच्यावर कशी काय कारवाई करू शकते?

मोइत्रांची चूक काय?नैतिकता समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर म्हणाले की, खा. महुआ मोइत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होऊ शकते. त्यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवले जाऊ शकते, कारण हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. येथे केवळ पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा मुद्दा नाही, तर संसदेचे लॉग इन, आयडी एखाद्या व्यावसायिकाला विदेशात देण्यात आले. याचा दुरुपयोगही झाला असता. 

कांगारू कोर्टाने दिलेला हा पूर्वनियोजित निकाल आहे. भारतीय लोकशाहीचा मृत्यू झाल्याचे हे निदर्शक आहे. विद्यमान लोकसभेतून माझी हकालपट्टी केली तरी मी पुढील लोकसभेत मोठ्या मताधिक्याने परतेन. मात्र, मी यामुळे गप्प राहणार नाही. आधी माझी हकालपट्टी होऊ द्या, मग मी पुढचे पाऊल उचलणार आहे.-महुआ मोइत्रा, खासदार 

टॅग्स :Mahua Moitraमहुआ मोईत्राlok sabhaलोकसभाParliamentसंसद