शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

महुआ मोईत्रा आणखी अडचणीत, कॅश फॉर क्वेरी प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश    

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 17:05 IST

Mahua Moitra Cash-For-Query Case: राजधानी दिल्लीतील राजकीय वर्तुळात सध्या गाजत असलेल्या कॅश फॉर क्वेरी प्रकरणामध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

राजधानी दिल्लीतील राजकीय वर्तुळात सध्या गाजत असलेल्या कॅश फॉर क्वेरी प्रकरणामध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मी केलेल्या तक्रारीच्या आधारावर लोकपालांनी महुआ मोईत्रा यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी दिली आहे. 

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये निशिकांत दुबे म्हणाले की, माननीय लोकपाल यांनी आज मी केलेल्या तक्रारीच्या आधारावर आरोपी खासदार महुआ मोईत्रा यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.  या प्रकरणामध्ये निशिकांत दुबे यांनीच महुआ मोईत्रा यांनी संसदीय आयडीचा आपला लॉगइन पासवर्ड शेअर केला होता, असा आरोप केला होता. महुआ मोइत्रा यांच्या संसदीय खात्यावर दुबईतून ४७ वेळा लॉग-इन झाल्याची माहिती देण्यात आली आहे.  

महुआ मोईत्रा ह्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर एक आक्रमक खासदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँकर होत्या. दरम्यान, सध्या महुआ मोईत्रा या संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन चर्चेत आहेत.

टॅग्स :Mahua Moitraमहुआ मोईत्राAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसParliamentसंसदlok sabhaलोकसभा