महावितरणच्या आश्वी उपकेंद्रास टाळे वीजप्रश्नी मोर्चा : अधिकारी-कर्मचारी गैरहजर

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:50+5:302015-07-10T21:26:50+5:30

आश्वी : महावितरणचे कर्मचारी आश्वी उपकेंद्रात हजर राहत नसल्याने रात्रीच्या वेळी वारंवार खंडित होणार्‍या वीज पुरवठ्यास तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शुक्रवारी पंचायत समितीचे विरोधी पक्ष नेते सरूनाथ उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेवून उपकेंद्रास टाळे ठोकले.

Mahavitaran's Ashli ​​sub-center Talay electricity questionnaire: Officer-employee absentee | महावितरणच्या आश्वी उपकेंद्रास टाळे वीजप्रश्नी मोर्चा : अधिकारी-कर्मचारी गैरहजर

महावितरणच्या आश्वी उपकेंद्रास टाळे वीजप्रश्नी मोर्चा : अधिकारी-कर्मचारी गैरहजर

्वी : महावितरणचे कर्मचारी आश्वी उपकेंद्रात हजर राहत नसल्याने रात्रीच्या वेळी वारंवार खंडित होणार्‍या वीज पुरवठ्यास तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शुक्रवारी पंचायत समितीचे विरोधी पक्ष नेते सरूनाथ उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेवून उपकेंद्रास टाळे ठोकले.
गेल्या काही दिवसांपासून आश्वी उपकेंद्रातील वीज पुरवठा रात्रीच्या वेळी अनेकदा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र महावितरणचे कर्मचारी बाहेर गावी राहत असल्याने दखल घेण्यासाठी कुणीही उपलब्ध होत नाही. गुरूवारी रात्री नेहमीप्रमाणे वीज पुरवठा खंडित झाल्याने लाईनमन अमोल सांगळे यास संपर्क साधला असता मला वेळ नाही, माणसे नसल्याने काम होवू शकत नाही, असे उर्मट उत्तर त्याने दिले. तसेच तक्रार करणार्‍या नागरिकांना अरेरावी केली. या प्रकाराने संतप्त झालेल्या नागरिकांनी उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता उपकेंद्रावर मोर्चा नेला. साडेअकरा वाजता कार्यालयात एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे नागरिकांनी कार्यालयास टाळे ठोकले. बेजबाबदार कर्मचार्‍यांना निलंबित करावे, गावात कामयस्वरूपी कर्मचारी नेमावेत, अशा मागण्या करीत महावितरणचा सावळा गोंधळ त्वरित न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उंबरकर यांनी दिला. याप्रसंगी माजी सरपंच हरिभाऊ ताजणे, मधुकर गायकवाड, रामनाथ साळवे, नवनाथ ताजणे, अनिस शेख, प्रकाश मैड, भाऊसाहेब खेमनर, रामा गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
़़़़़़़़़़
आश्वी हे बाजारपेठेचे गाव असून बँका, पतसंस्था मोठ्या प्रमाणावर आहेत. वेळी-अवेळी काहीही अनुचित प्रकार घडू शकतात. याचा गांभीर्याने विचार करून महावितरणने रात्रीचा वीज पुरवठा सुरळीत ठेवावा.
-हरिभाऊ ताजणे, माजी सरपंच

फोटो-१०एसएएनपी०२ महावितरण ओळी- महावितरणच्या आश्वी उपकेंद्रास टाळे ठोकताना पं.स. विरोधी पक्ष नेते सरूनाथ उंबरकर, हरिभाऊ ताजणे, मधुकर गायकवाड, रामनाथ साळवे, नवनाथ ताजणे, अनिस शेख आदी.

Web Title: Mahavitaran's Ashli ​​sub-center Talay electricity questionnaire: Officer-employee absentee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.