महाविरणच्या अभियंत्याचा प्रताप
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:29+5:302015-02-14T23:50:29+5:30
महावितरणच्या अभियंत्याचा प्रताप

महाविरणच्या अभियंत्याचा प्रताप
म ावितरणच्या अभियंत्याचा प्रतापपरस्पर काढली जाहिरातऔरंगाबाद : महावितरणच्या एका सहायक अभियंत्याने महिला कर्मचारी भरती करण्यासाठी वृत्तपत्रात परस्पर जाहिरात दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे़ विशेष म्हणजे त्या अभियंत्याने कार्यालयात काही महिला उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.क्रांतीचौक उपविभागातील सहायक अभियंता संदीप जयस्वाल यांनी ६ फेब्रुवारी रोजी एका वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. टायपिंग येणे आवश्यक आणि वेतन पाच हजार रुपये अशी सूचना त्यात होती. अनेक महिला उमेदवारांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला़ संपर्क साधलेल्या महिलांपैकी पात्र असणार्या उमेदवारांच्या ७ फेब्रुवारी रोजी मुलाखती कार्यालयात घेण्यात आल्या. जयस्वाल यांनी केलेल्या कारभाराची माहिती अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी संदीप जयस्वाल याला १२ फेब्रुवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तीन दिवसांत खुलासा न केल्यास कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. महावितरणने शहरातील वीज पुरवठ्याचा ताबा घेऊन तीन महिने झाले आहेत; पण अद्यापही कंपनीने शंभर टक्के कर्मचारी भरती न केल्यामुळे अधिकार्यांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे जीटीएलकडून वीजपुरवठ्याचा ताबा घेण्यापूर्वी कंपनीच्या मुख्यालयाने ७९९ कर्मचार्यांची मंजुरी दिलेली आहे. सध्या शहरात ४७३ कर्मचारी २६ शाखा कार्यालयात कार्यरत आहेत. ३२६ जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांनाही सेवा-सुविधा मिळत नाही; पण अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत. --------- चुकून जाहिरात पिं्रट झालीकारणे दाखवा नोटीस मिळाली आहे. त्याचे उत्तर देणार आहे. दिलेली जाहिरात चुकून प्रिंट झालेली आहे. माझ्या वैयक्तिक कामासाठी जाहिरात दिली होती. कोणत्याही महिला उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या नाहीत.- संदीप जयस्वाल, सहायक अभियंता, क्रांतीचौक--------कोणत्याही अभियंत्याला परस्पर जाहिरात देता येत नाही. त्यासाठी वरिष्ठांची मंजुरी लागते,जयस्वाल यांनी नियमबाह्य काम केले आहे. नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.- एम.एम. शेळके, कार्यकारी अभियंता, क्रांतीचौक