शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीची शिष्टाई फळली; सीमावादावर दोन्ही मुख्यमंत्र्यांची होणार बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 05:44 IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले सर्वपक्षीय बैठकीचे संकेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी वादावर केली चर्चा 

बंगळुरू : महाराष्ट्रासोबतच्या सीमावादाबाबत राज्याची भूमिका आणि वस्तुस्थितीची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिली आहे. पुढील आठवड्यात ते दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवू शकतात, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सांगितले. या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकार लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात शुक्रवारी अमित शहा यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले आहे.

बोम्मई म्हणाले की, मी आमच्या खासदारांच्या शिष्टमंडळाला अमित शहा यांची सोमवारी भेट घेण्यास सांगितले आहे. शहा यांनी मला सांगितले की, दोन ते तीन दिवसांत मला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ते बोलावतील. बहुधा, ही बैठक १४ किंवा १५ डिसेंबरला होईल. 

वाद नेमका काय?आठवड्याच्या सुरुवातीला सीमावादाचा मुद्दा पुन्हा पेटला. वाहनांना लक्ष्य केले जात आहे. त्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. १९५७ मध्ये राज्यांच्या पुनर्रचनेनंतरचा हा सीमावाद आहे. महाराष्ट्राने बेळगाववर हक्क सांगितलेला असून, या भागात मोठ्या प्रमाणात मराठी भाषक आहेत. सध्या कर्नाटकचा भाग असलेल्या ८१४ मराठी भाषक गावांवरही महाराष्ट्राने दावा केलेला आहे. कर्नाटक राज्य पुनर्रचना कायदा व १९६७ च्या महाजन आयोगाच्या अहवालाच्या आधारे भाषक धर्तीवर सीमांकन केलेले आहे. कर्नाटकने बेळगावमध्ये सुवर्ण विधान सौधची उभारणी केलेली आहे. हे मॉडेल बंगळुरूतील विधिमंडळ इमारतीच्या आधारे आहे.

‘आमची बाजू मजबूत’या मुद्यावर आपण विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांच्याशी बोलणार आहोत, असे सांगून बोम्मई म्हणाले की, मी काल सिद्धरामय्या यांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितले की, मी त्यांना पुढील घडामोडींची माहिती देईन. 

मुख्यमंत्री बोम्मई यांनी शुक्रवारी रात्री म्हटले होते की, महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही आणि आमचे सरकार या प्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे, असे सांगून ते म्हणाले की, हे प्रकरण न्यायालयात आहे. आमची बाजू भक्कम आहे.

टॅग्स :belgaonबेळगावEknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाह