शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावमध्ये महात्मा गांधीजींचा पुतळा, स्वातंत्र्यसेनानी गंगाधरराव देशपांडे यांच्या स्मारकाचे लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:42 IST

छायाचित्र दालनाचे लोकार्पण : काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी महोत्सव

बेळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली येथील टिळकवाडीतील वीरसौध परिसरात १९२४ मध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते. या अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याचे अनावरण आणि दुर्मीळ छायाचित्रांच्या दालनाचे लोकार्पण उत्साहात पार पडले.महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते, तर छायाचित्रांच्या दालनाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी वीरसौध वास्तूतील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या बैठ्या पुतळ्याला अभिवादन करून आदरांजली वाहिली.याप्रसंगी मंत्री एच. के. पाटील, एम. बी. पाटील, एच. सी. महादेवप्पा, लक्ष्मी हेब्बाळकर, शरण प्रकाश, के. एच. मुनियप्पा, आमदार असिफ तथा राजू सेठ, आमदार चन्नराज हट्टीहोळी, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, माहिती खात्याचे सचिव कामेरी बी. बी., आयुक्त हेमंत निंबाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, माहिती खात्याचे संयुक्त संचालक मंजुनाथ डोळ्ळीन, उपसंचालक गुरुनाथ कडबुर आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यसेनानी गंगाधरराव देशपांडे यांच्या स्मारकाचे लोकार्पण१९२४ मध्ये महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे झालेले काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेले स्वातंत्र्यसैनिक गंगाधरराव देशपांडे यांच्या रामतीर्थनगर येथील स्मारकाचे लोकार्पण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते झाले.‘गांधी भारत - १००’ कार्यक्रमांतर्गत शंभर वर्षांपूर्वी पार पडलेल्या येथील काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवाचा भाग म्हणून हे स्मारक उभारण्यात आले आहे. १५ गुंठे जागेत बांधण्यात आलेल्या या स्मारकासाठी १ कोटी ५८ लाख रुपये इतका खर्च आला आहे. स्मारकात दिवंगत देशपांडे यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. तसेच बेळगाव अधिवेशन, महात्मा गांधीजी यांच्या हुदली येथील आठवड्याच्या वास्तव्यात पार पडलेले ग्रामोद्योग प्रदर्शन आणि गांधीजींच्या जीवनातील अन्य दुर्मीळ छायाचित्रे या ठिकाणी लावण्यात आली आहेत.

टॅग्स :Karnatakकर्नाटकbelgaonबेळगावcongressकाँग्रेसsiddaramaiahसिद्धरामय्या