महात्मा गांधी, नेहरूंची कच-याशी तुलना, भाजपा खासदाराला अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 05:02 AM2017-10-24T05:02:55+5:302017-10-24T05:03:05+5:30

गुवाहाटी : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची कच-याशी तुलना केल्याचा आरोप करून काँग्रेसने भाजपाचे जोरहाट (आसाम) येथील खासदार कामाख्य प्रसाद तासा यांना अटक करण्याची मागणी केली.

Mahatma Gandhi, Nehru & # 39; s sketch, compare BJP MPs | महात्मा गांधी, नेहरूंची कच-याशी तुलना, भाजपा खासदाराला अटक करा

महात्मा गांधी, नेहरूंची कच-याशी तुलना, भाजपा खासदाराला अटक करा

Next

गुवाहाटी : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची कच-याशी तुलना केल्याचा आरोप करून काँग्रेसने भाजपाचे जोरहाट (आसाम) येथील खासदार कामाख्य प्रसाद तासा यांना अटक करण्याची मागणी केली.
कामाख्य प्रसाद तासा यांनी शनिवारी सोनारी (जिल्हा शिवसागर) येथील जाहीर मेळाव्यात काँग्रेसने वर्षानुवर्षे लोकांच्या मनात नेहरू-गांधी यांचा कचरा भरला त्यामुळे आता त्यात इतर कोणत्याही गोष्टीसाठी जागा राहिलेली नाही, असे म्हटले होते. या वेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवालही उपस्थित होते.
त्यांच्या विधानानंतर खळबळ उडाल्यामुळे तासा यांनी माझे विधान चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आले आहे, असा खुलासा केला. नेहरू व गांधी यांच्या नावाचा उल्लेख मी तसा केला नव्हता. मी म्हणालो की, नेहरू व गांधी यांच्या नावाने कचरा पुन्हा पुन्हा तयार केला गेला आहे.
तासा यांच्याविरोधात काँग्रेसने राज्यात रविवारी निदर्शने केली व गुवाहाटी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदविला आणि अटकेची मागणी केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Mahatma Gandhi, Nehru & # 39; s sketch, compare BJP MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा