महाशिवरात्री - जोड
By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:13+5:302015-02-16T23:55:13+5:30
महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

महाशिवरात्री - जोड
म ाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजननागपूर : महाशिवरात्री भगवान शंकराचा सर्वात महत्त्वाचा दिवस. मानवी आत्म्याला पवित्र करणारे हे व्रत. हे व्रत केल्यास पापांचा नाश होऊन हिंसकवृत्ती नष्ट होते. हिंदू धर्मात महाशिवरात्री पूजनाला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीनिमित्त सर्व शिवमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोक्षधाम घाटावर तर महाशिवरात्रीची यात्राच भरते. शहरातील महाल, तेलंगखेडी येथील प्राचीन शिवमंदिरात अभिषेक, पूजा, महाआरती, कीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. नवाबपुरा शिवमंदिर सकाळी ९ वाजता मंदिरात भगवान शिवचा लघुरुद्राभिषेक होणार आहे. त्यानंतर सुंदरकांड पाठ व भजन, कीर्तन होईल. भाविकांना लस्सी व प्रसादाचे वितरण करण्यात येईल. सतीधाम, न्यू नंदनवनमहाशिवरात्रीनिमित्त न्यू नंदनवन येथील सतीधाम मंदिरात भगवान शिवचा अभिषेक, महाआरती, भजन-कीर्तन, प्रसादाचे वितरण करण्यात येईल. श्री सद्गुरू सिद्धारूढ अध्यात्म समितीरामनगर येथील सिद्धारूढ शिवमंदिर येथे श्री सद्गुरू सिद्धारूढ अध्यात्म समितीतर्फे महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात नर्मदा नदीतून मिळालेल्या भगवान चंद्रमौलेश्वरांच्या दुर्मिळ शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार आहे. मंदिरात सकाळपासून जप, कीर्तन, रुद्राभिषेक, सद्गुरू चरित्रग्रंथाचे अखंड पारायण होईल. मध्यरात्री रुद्राभिषेक होईल. कल्याणेश्वर मंदिर, महालमहाशिवरात्रीनिमित्त महाल परिसरातील कल्याणेश्वर मंदिरात इक्षुरसाने (उसाच्या रसाने) अखंड महाभिषेक करण्यात येईल. सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत अभिषेक करण्यात येईल. वेदमंत्रोच्चारात भाविकांनाही नि:शुल्क इक्षुरसाचा अभिषेक करता येईल. आर्ट ऑफ लिव्हिंगमहाशिवरात्रीनिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने दहेगाव येथील विदर्भ आश्रमात सकाळी ९ वाजता महारुद्र पूजा व सायंकाळी सुप्रसिद्ध गायक विक्रम हाजरा यांच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल महाराष्ट्र गुरव समाजनवीन सुभेदार लेआऊट, हुडकेश्वर रोड येथील शिवभूमीत अखिल महाराष्ट्र गुरव समाजातर्फे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आ. सुधाकर कोहळे यांच्या हस्ते भगवान शिवचा अभिषेक होणार आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.