'महाशिवरात्री'ला उत्तरप्रदेशातील शिवमंदिरात मुस्लिम भक्ताचा सन्मान
By Admin | Updated: March 7, 2016 19:58 IST2016-03-07T19:50:15+5:302016-03-07T19:58:06+5:30
देशात अजूनही सहिष्णू-असहिष्णूतेवरुन वादविवाद सुरु असताना उत्तरप्रदेशातील एका २०० वर्ष जुने शिवमंदिर 'महाशिवरात्री'ला आपल्या मुस्लिम भक्तांताला सन्मानित करणार आहे.

'महाशिवरात्री'ला उत्तरप्रदेशातील शिवमंदिरात मुस्लिम भक्ताचा सन्मान
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. ७ - देशात अजूनही सहिष्णू-असहिष्णूतेवरुन वादविवाद सुरु असताना उत्तरप्रदेशातील २०० वर्ष जुने शिवमंदिर 'महाशिवरात्री'ला आपल्या मुस्लिम भक्ताला सन्मानित करणार आहे. नुरुल हसन असे या ७५ वर्षीय मुस्लिम भक्ताचे नाव असून, नुरुल यांनी मंदिराची वर्षानुवर्ष जी सेवा केली त्याबद्दल मंदिर व्यवस्थापन त्यांना सन्मानित करणार आहे.
लखनऊच्या सादर भागात हे शिवमंदिर आहे. महाशिवरात्रीला मंदिरात महाभिषेक झाल्यानंतर लखनऊचे महापौर दिनेश शर्मा हसनला सन्मानित करणार आहेत. हसनचे घर शिवमंदिराला लागून आहे. मंदिरातील धार्मिक विधीच्या तयारीसाठी हसन नेहमीच आपल्या घरासमोरची जागा देतो.
अभिषेकासाठी आपल्या घरातून पाणीपुरवठा करतो. मंदिराच्या दैनंदिन कामकाजावर त्याचे लक्ष असते. विश्वस्तांच्या निर्णयात त्याने नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे म्हणून मंदिर व्यवस्थापन महाशिवरात्रीच्या निमित्ताने हसनला सन्मानित करणार आहे असे मंदिराचे पदाधिकारी अवनिश कुमार अगरवाल यांनी सांगितले.