महाशक्ती अकोल्यातून उमेदवार देणार

By Admin | Updated: September 26, 2014 02:09 IST2014-09-26T02:09:43+5:302014-09-26T02:09:43+5:30

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत केलेल्या चर्चा निष्फळ ठरल्याने महाशक्तीतर्फे अकोल्यातून उमेदवार उभे करण्याची घोषणा महाशक्तीचे नेते राजेंद्र गवई यांनी केली आहे.

Mahashakti will be the candidate from Akola | महाशक्ती अकोल्यातून उमेदवार देणार

महाशक्ती अकोल्यातून उमेदवार देणार

मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत केलेल्या चर्चा निष्फळ ठरल्याने महाशक्तीतर्फे अकोल्यातून उमेदवार उभे करण्याची घोषणा महाशक्तीचे नेते राजेंद्र गवई यांनी केली आहे.
याआधी आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याने महाशक्तीने केवळ २० उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यात अकोला जिल्ह्यातून एकाही उमेदवाराची घोषणा केली नव्हती. आता अकोल्यासह राज्यातील इच्छुकांची यादी महाशक्ती शुक्रवारी जाहीर करेल, असे गवई यांनी सांगितले. महाशक्तीमध्ये गवई यांचा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई), आवामी विकास पार्टी आणि ओबीसी एनटी पार्टी आॅफ इंडिया या पक्षांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mahashakti will be the candidate from Akola