ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होण्यात महाराष्ट्र देशात अव्वल
By Admin | Updated: November 15, 2016 22:23 IST2016-11-15T22:23:17+5:302016-11-15T22:23:17+5:30
ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन परवाना रद्द करण्यात महाराष्ट्राचा नंबर अव्वल आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होण्यात महाराष्ट्र देशात अव्वल
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन परवाना रद्द करण्यात महाराष्ट्राचा नंबर अव्वल आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली आहे. तर दारू पिऊन गाडी चालवणे, वेगमर्यादेपक्षा जास्त वेगात गाड्या पळवणे या गुन्ह्यांत वाहनचालकांचे परवाने रद्द केल्याचं या आकडेवारीवरून समोर आले आहे.
दिल्लीमध्ये 50 हजारांहून जास्त वाहन चालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर ओडिशामध्ये 24,336 परवाने रद्द करण्यात आले आहेत. रस्ते अपघातातील आकडेवारी सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांकडे मागितली होती. काही राज्यांनी ही आकडेवारी सादरच केली नसल्याचं उघड झालं आहे.
हरियाणा सरकारनं 2.15 लाख लोकांकडून हेल्मेट न घातल्यानं पावत्या फाडल्या. तर राजस्थान हेल्मेट न घालणा-या वाहनचालकांच्या आकडेवारीत दुस-या क्रमांकावर आहे.