महाराष्ट्र सदन पुन्हा वादात, यंदा गणेशोत्सव नाही?
By Admin | Updated: August 4, 2014 14:39 IST2014-08-04T11:04:08+5:302014-08-04T14:39:10+5:30
महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त यांनी सदनात गणेशोत्सव साजरा न करण्याचा फतवा काढल्याने नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्र सदन पुन्हा वादात, यंदा गणेशोत्सव नाही?
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ४ - महाराष्ट्र सदनात मराठी खासदारांना मिळालेली दुय्यम वागणूक, निकृष्ट भोजन व त्यानंतर मुस्लीम कर्मचा-याला चपाती भरवण्यावरून झालेला गोंधळ, या सर्व घटना अद्याप ताज्या असतानाचा महाराष्ट्र सदन पुन्हा एकदा चर्चैत आले आहे. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त यांनी यंदा महाराष्ट्र सदनाता गणेशोत्सव साजरा न करण्याचा फतवा काढल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
महाराष्ट्र सदनात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाता साजरा होतो, त्यानिमित्ताने दिल्लीतील सर्व मराठी बांधव एकत्र येतात. मात्र बिपिन मलिक यांचा या उत्सवाला विरोध असून गेल्या २-३ वर्षापांसून त्यांनी गणेशोत्सव बंद करावा, असा धोशा लावला आहे. यावर्षी त्यांनी गणेशोत्सवासाठी जागा देणेही नाकारले असून सदनात 'बाप्पाची' प्रतिष्ठापना करण्यास, पूजा करण्यास मनाई करत हा उत्सव साजरा न करण्याचा फतवा काढला आहे. 'राज्य शासनाचा सदनात साज-या होणा-या गणेशोत्सवाशी काहीही संबंध नाही. राज्य शासन यात सहभागी होत नाही, त्यामुळे यावर्षी सदनात उत्सव साजरा होईल की नाही हे आपल्याला माहीत नाही', असे मलिक यांनी सांगितल्याचे समजते.
दिल्लीत १९९७ सालापासून गणेशोत्सव साजरा होतो. सदनातील अनेक कर्मचारी कठोर परिश्रम करून हा उत्सव उत्साहात साजरा करत असत. मात्र आता मलिक यांच्या या भूमिकेमुळे अनेक वर्षापांसून सुरू असलेली गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा खंडित होण्याची शक्यता आहे.