शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: म्हणून सत्तांतराच्या खेळीसाठी भाजपने ‘होमपीच’ बदलली, गुजरातऐवजी गुवाहाटी केंद्रस्थानी आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 09:41 IST

Maharashtra Politics: गुजरातमधूनच महाराष्ट्रातील नव्या सरकारची मुहूर्तमेढ करण्याचा डाव होता; मात्र ऐनवेळी बदललेल्या राजकीय हवामानाने विरोधकांचे बाऊन्सर व गुगलीने विकेट पडण्याची भीती लक्षात घेता सर्व प्रकारची खबरदारी घेत या खेळीसाठी गुजरातची ‘पीच’ बदलून आसाममधील गुवाहाटीत हा खेळ खेळण्याचा भाजपने निर्णय घेतल्याची चर्चा आता राजकीय गोटात रंगली आहे.

- रमाकांत पाटील सुरत : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पुरस्कृत सरकार स्थापण्याच्या खेळीसाठी भाजपने खरं तर गुजरातच्या ‘होमपीच’ची निवड केली होती. गुजरातमधूनच महाराष्ट्रातील नव्या सरकारची मुहूर्तमेढ करण्याचा डाव होता; मात्र ऐनवेळी बदललेल्या राजकीय हवामानाने विरोधकांचे बाऊन्सर व गुगलीने विकेट पडण्याची भीती लक्षात घेता सर्व प्रकारची खबरदारी घेत या खेळीसाठी गुजरातची ‘पीच’ बदलून आसाममधील गुवाहाटीत हा खेळ खेळण्याचा भाजपने निर्णय घेतल्याची चर्चा आता राजकीय गोटात रंगली आहे.

विधान परिषदेच्या मतमोजणीत सर्वच राजकीय पक्ष दंग असताना शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदार व मंत्र्यांसह बंडाचा झेंडा घेत गुजरातच्या दिशेने रवाना झाले. या आमदारांच्या पाहुणचारासाठी गुजरातमधील प्रशासन व भाजपचे नेते यापूर्वीच सक्रिय झाले होते. बलसाड येथे तर गुजरातमधील भाजपचा बडा नेता या आमदारांच्या स्वागतासाठी थांबले होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढे या सर्व आमदार व मंत्र्यांनी सुरत येथील हॉटेल गाठले आणि तेथेच मुक्काम ठोकला. बाहेर कुणाला कुणकुण लागण्यापूर्वीच हॉटेलमध्ये सर्व डावपेच ठरले आणि त्यानंतर गुजरातमधील भाजपचे नेते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. सकाळी याबाबत मीडियाला चुणूक लागताच सर्व महाराष्ट्रातील राजकीय नेते जागे झाले आणि आमदारांची शोधाशोध सुरू झाली. तोपर्यंत पाणी वाहून गेले होते.

काय होते नियोजन?गुजरातमध्ये एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक आमदार दाखल झाल्यानंतर नवीन सरकार स्थापण्याची पूर्ण प्रक्रिया केल्यानंतरच गुजरात सोडण्याचे नियोजन होते. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरत येथून या सर्व आमदारांना मंगळवारी दुपारीच गुजरातमधील आनंद, अहमदाबाद किंवा गांधीनगर या तीन ठिकाणी हलविण्याचे नियोजन होते. त्यासाठी आनंद व अहमदाबाद येथे हॉटेल आणि रिसोर्टचे बुकिंगही करण्यात आले होते. याचठिकाणी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व आमदारांना आणण्यात येणार होते. तेथेच संख्याबळाचे व मंत्रिमंडळातील खाते वाटपाची जुळवाजुळव करून नवीन सरकार स्थापन करण्याची मुहूर्तमेढ रोवण्यात येणार होती. 

का बदलले ठिकाण? जसजसा दिवस पुढे जात होता तसतशा राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. खास करून शिवसेनेने भाजपवर थेट आरोप करीत गुजरातमधील भाजप सरकारचा फायदा घेत व केंद्राच्या दबावाने हे सर्व घडत असल्याचे सांगितले. याशिवाय सुरत येथे हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या एका आमदाराच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारी वाढण्याची शक्यता लक्षात घेत आणि काही महिन्यातच होऊ घातलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर त्याचे राजकीय परिणाम होऊ नये शिवाय महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे खापर भाजपचे होमपीच असलेल्या गुजरातवर येऊ नये या सर्व बाबींचा विचार करीत सायंकाळी उशिरा आमदारांना गुजरातमधून गुवाहाटीत हलविण्याचा निर्णय झाला.

टॅग्स :BJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना