शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

"काँग्रेसकडे तर एकच नाथ, बाकी पूर्ण काँग्रेस अनाथ, बिचारे उद्धव..."; भाजपाचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:29 IST

Shivraj Singh Chouhan And KamalNath : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली -  राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय देवेंद्र फडणवीसांना कळवण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. यानंतर आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan) यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसही अतिशय अजब आहे. जो व्यक्ती स्वतःचं सरकार वाचवू शकला नाही (कमलनाथ), त्याला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी पाठवलं होतं. हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे असंच त्यांनीही केलं आणि बिचारे उद्धव ठाकरेही गेले. मला काँग्रेस आणि कमलनाथ दोघांच्याही विचाराची कीव येते. ना विकास करतात, ना लोकांचं कल्याण करतात. काँग्रेसकडे तर एकच नाथ आहेत, बाकी पूर्ण काँग्रेस अनाथ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देवेंद्र फडणवीस नाराज आहेत अशी चर्चा जोरदार रंगली होती. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार (BJP Sudhir Mungantiwar) यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस नाराज होते का? आणि दिल्लीमध्ये नेमक्या कोणत्या हालचाली झाल्या? य़ावर भाष्य केलं आहे. "भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सत्तेसाठी कधीच काम करत नाही. देवेंद्रजी यांचं मन विशाल आहे. राज्यामध्ये प्रगतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पाठीशी देवेंद्रजी यांनी आपला अनुभव उभा करावा हीच यामागची भावना आहे" असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील हाच निर्णय होता, तो निर्णय बदलला नाही. त्या निर्णयाला उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील ही जोड देण्यात आली. त्यामुळे कोणताच निर्णय बदलला नाही. फडणवीस सुरुवातीला सत्तेच्या बाहेर जाऊन आपला अनुभव शेअर करणार होते. पण राष्ट्रीय अध्यक्षांनी आग्रह केला, त्यांनी सांगितलं की, तुमचा पाच वर्षांचा विकासाचा, प्रगतीचा, राज्याच्या विकासाच्या गतीचा जो अनुभव आहे तो त्यांच्या पाठीशी असावा. व्यक्तिगत निर्णय या पक्षात होत नाहीत. नेतृत्व जे विचारपूर्वक सांगतं त्यावर आम्ही अमलबजावणी करतो. राज्यामध्ये प्रगतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पाठीशी देवेंद्रजी यांनी आपला अनुभव उभा करावा हीच यामागची भावना आहे" असं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानcongressकाँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ