शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
2
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
3
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
4
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
5
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
6
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
7
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
8
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
9
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
10
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
11
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
12
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
13
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
14
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
15
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
16
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
17
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
18
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
19
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
20
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...

सर्वोच्च न्यायालयात रंगला साडे तीन तास युक्तीवाद; काय घडले? 9 वाजता निकाल येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 20:47 IST

सत्ता मिळविण्यासाठी कायद्याची थट्टा, रामेश्वर प्रसाद खटल्याचा दाखला दिला. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारणा न करता अचानक बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला, असेही सिंघवी म्हणाले. सुमारे ५० मिनिटे सिंघवींचा युक्तीवाद चालला. 

शिवसेनेच्या वकिलांनी बहुमत चाचणी आठवडाभर पुढे ढकलावी असा युक्तीवाद केला आहे, तर शिंदे गट आणि राज्यपालांच्या वकिलांनी बहुमत चाचणी लोकशाहीसाठी कशी महत्वाची हे म्हटले आहे. यानंतर सुमारे साडे तीन तास चाललेला हा युक्तीवाद साडे आठच्या सुमारास संपला. सर्वोच्च न्यायालय यावर रात्री ९ वाजता निकाल जाहीर करणार आहे. बहुमत चाचणी होणार की पुढे ढकलली जाणार, हे थोड्याच वेळात ठरणार आहे. 

बहुमत चाचणीला सर्व आमदार उपस्थित हवेत, तेव्हाच ही चाचणी होऊ शकते. आम्हाला आजच हे पत्र मिळाले. राज्यपालांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून काम करायचे नसते. राज्यपालांच्या प्रत्येक निर्णयाची कायदेशीर तपासणी होऊ शकते. राज्यपालांनी शिंदे गटाचे पत्र का तपासले नाही. ११ जुलैला बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी आहे, तोवर राज्यपाल थांबू शकले नसते का? असा युक्तीवाद शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला.

सत्ता मिळविण्यासाठी कायद्याची थट्टा, रामेश्वर प्रसाद खटल्याचा दाखला दिला. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारणा न करता अचानक बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला, असेही सिंघवी म्हणाले. सुमारे ५० मिनिटे सिंघवींचा युक्तीवाद चालला. 

यानंतर शिंदेगटाच्या बाजुने नीरज किशन कौल यांच्याकडून युक्तीवाद सुरु झाला. विधान सभा उपाध्यक्ष पदावर राहतील की नाही, हा निर्णय महत्वाचा. बहुमत चाचणी ही लोकशाही मजबूत करणारी गोष्ट. उद्याच बहुमत चाचणी घेतली नाही तर घोडेबाजार होईल, आमदारांचे करिअर धोक्यात येईल. बहुमताचा निर्णय घेणे हा राज्यपालांचा अधिकार, तो एवढा आक्षेपार्ह आहे का? आधी बहुमत चाचणी होऊद्या, नंतर अन्य निर्णय घ्या, अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांची सर्वोच्च न्यायालयाकडे केली. अविश्वास प्रस्ताव असलेले विधानसभा उपाध्यक्ष आमदारांना नोटीस कशी देऊ शकतात, आधी त्यांच्यावर निर्णय होऊद्या, असेही ते म्हणाले. 

यानंतर राज्यपालांच्या बाजुने राज्यपालांचे वकील मनिंदर सिंह आणि मेहता यांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी  बहुमत चाचणी बोलविण्यासाठी राज्यपालांना कोणाच्याही सूचनेची गरज नाही. बहुमत चाचणी घ्या, बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचा तो नैसर्गिक अधिकार आहे. 39 आमदारांच्या जिवाला धोका होता, संजय राऊत यांचे वक्तव्य दुर्लक्ष करण्यासारखे नाहीय. आमदारांच्या जिवाला धोका होता, त्यामुळे राज्यपाल दुर्लक्ष करू शकत नव्हते, असा युक्तीवाद करण्यात आला. सुमारे तीन तास हा युक्तीवाद सुरु होता. यानंतर पुन्हा शिवसेनेचे वकील सिंघवी यांनी प्रतियुक्तीवाद केला. अध्यक्ष चुकू शकतात, पण राज्यपाल नाहीत का? राज्यपाल पवित्र गाय आहेत का? असा सवाल केला. नेहमी अध्यक्षांच्या अधिकारांवर आक्षेप का? अध्यक्षांना अधिकार दिल्यानंतरच बहुमत चाचणी घ्यावी. यासाठी आठवड्याची मुदत द्यावी, अशी मागणी सिंघवी यांनी केली.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना