शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकार कोसळणे भाजपाच्या पथ्थ्यावर, राष्ट्रपती निवडणुकीपासून लोकसभेपर्यंत फायदाच फायदा, असं आहे समिकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 13:35 IST

सत्ता बदलामुळे राज्यातील समिकरणे मोठ्या प्रमामात बदलणार असून, महाविकास आघाडी सरकार कोसळणे भाजपाच्या पथ्थ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.

मुंबई - शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर अखेर उद्धव ठाकरे यांना काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्याबरोबरच गेल्या अडीच वर्षांपासून राज्याच्या सत्तेवर असलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडी सरकारही कोसळले. मविआ सरकार कोसळल्याने आता राज्यात एकनाथ शिंदे गटाच्या पाठिंब्याने देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. या सत्ता बदलामुळे राज्यातील समिकरणे मोठ्या प्रमामात बदलणार असून, महाविकास आघाडी सरकार कोसळणे भाजपाच्या पथ्थ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रातील सत्तांतरामुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी मिळाली आहे. सध्या लोकसभेमध्ये तब्बल १६८ खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार अशा तीन राज्यात भाजपाचं सरकार सत्तेवर आहे. त्यातच लोकसभा निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढण्यासाठी भाजपाने महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू केली आहे. २०१९ मध्ये या तिन्ही राज्यातून भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांनी १६८ पैकी १४४ जागा जिंकल्या होत्या. आता २०२४ मध्ये त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.

देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी दिली आहे. तर विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना संयुक्तरीत्या उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीमध्ये भाजपाला काही मते कमी पडत होती. मात्र आता महाराष्ट्रात सत्ता समिकरणं बदलल्याने भाजपाचे समर्थन असलेल्या उमेदवाराला अधिकची मतं मिळणार आहे.

राजकारणामध्ये परस्पर विरोधी विचारांच्या आघाड्यांची सरकारं फार काळ टिकत नाहीत. हल्लीचा इतिहास पाहिल्यास २०१५ मध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाची आघाडी झाली होती. मात्र दोन वर्षांतच ते सरकार कोसळले होते. तर २०१९ मध्ये महराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी झाली. मात्र  या आघाडीत सुरुवातीपासून अनेक मतभेद होते. पण बाहेर सारं काही आलबेल असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर शिवसेनेतील बंडखोरीमुळे हे सरकार पडले.

दरम्यान, राज्यात झालेल्या सत्तापरिवर्तनाचा आणि शिवसेनेतील बंडाळाचा परिणाम काही दिवसांनी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही दिसणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आधीपासूनच कंबर कसली आहे. त्यात आता शिवसेना बंडखोरीमुळे कमकुवत झाल्याने त्याचाही फायदा भाजपाला होणार आहे. त्यामुळे मुंबईत स्वबळावर जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका