शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात 15 जिल्ह्यांत रोज शंभरावर रुग्ण, १७ राज्यांत ७३ जिल्ह्यांत संसर्ग दर १०% पेक्षा जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 11:49 IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार १४ राज्यांतील या जिल्ह्यांत दररोज शंभराहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे.

नितीन अग्रवाल -नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत असले तरी, देशातील ९१ जिल्ह्यांत अजूनही संसर्गाचा धोका आहे. यात महाराष्ट्रातील १५ जिल्हे आहेत.  एकूण ८० टक्के रुग्ण याच जिल्ह्यांत आढळत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार १४ राज्यांतील या जिल्ह्यांत दररोज शंभराहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. यात महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील सर्वाधिक १५-१५ जिल्ह्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त  केरळमधील १४, ओडिशाचे ११, आंध्र प्रदेशमधील १०, आसामचे ९ आणि कर्नाटकच्या ६ जिल्ह्यांचाही समावेश आहे. ४ मे रोजी संपलेल्या आठवड्यात अशा जिल्ह्यांची संख्या ४४० होती.कोरोना प्रतिबंधक लसीच्या अतिरिक्त (बुस्टर) डोसबाबत विचारले असता भार्गव यांनी सांगितले की, हा मुद्दा विचाराधीन आहे.  लसीचा प्रभाव किती दिवस असेल, याची पूर्ण माहिती सध्या नाही.  किती दिवस ॲन्टीबॉडी टिकतात, ही माहिती खूप महत्त्वपूर्ण असेल. असे मानले जाते की, कोरोनाचा संसर्ग झाल्यास ७ ते १२ महिन्यांपर्यंत ॲन्टीबॉडी राहतात.  लसीच्याबाबतीत हा अवधी किती असेल, याची माहिती कळायची आहे.आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशभरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १० मे ३७ लाखांहून कमी होऊन ४.६४ लाखांवर आली. रुग्ण बरे होण्याचा दर ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ८१.८ टक्के होता, तो वाढून  ९७.२ टक्के झाला आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अनेक भागात कोरोना निर्बंध शिथिल केले जात असताना कोरोनासंबंधीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.

१७ राज्यांतील ७३ जिल्ह्यांत धोका-    कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी जरूर होत आहे. परंतु, अजूनही १७ राज्यांतील ७३ जिल्ह्यांतील संसर्गाचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे. यात सर्वाधिक जिल्हे अरुणाचल प्रदेशातील  आहेत. त्यानंतर राजस्थानचे १०, मणिपूरचे ९, केरळचे ७, मेघालयातील ९ जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. -    याशिवाय त्रिपुरा आणि सिक्कीममधील प्रत्येकी चार, ओडिशा आणि नागालँडमधील प्रत्येकी ३ जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील फक्त एकाच जिल्ह्यात हा दर १० टक्क्यांपेक्षा कमी आहे.

३३ हजारांहून अधिक लोकांचा सहभाग असलेल्या सर्वेक्षणानुसार असे आढळले की, २४ टक्के लोक मास्क लावत नाहीत. ४५ टक्के लोक योग्यप्रकारे मास्क लावत नाही. तसेच मास्क लावणाऱ्या लोकांची संख्या फक्त २९ टक्के आहे. ११ टक्केच लोक सोशल डिस्टन्सिंगचे पालन  करीत असल्याचे आढळले.  लसीकरण केंद्रावर ४४ टक्के आणि प्रवासात केवळ १५ टक्केच लोकांनी कोरोना नियमांचे पालन केले, असे अग्रवाल यांनी सांगितले.

५९५ जिल्ह्यांतील संसर्ग दर पाच टक्क्यांपेक्षा कमीभारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) प्रमुख बलराम भार्गव यांनी सांगितले की, ६५ जिल्ह्यांतील लोकांंना संसर्ग होण्याचा दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. ५९५ जिल्ह्यांतील दर ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, हे चांगले संकेत आहेत. परंतु, ज्या ठिकाणी संसर्ग दर ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्या ठिकाणी खबरदारी घेत उपाययोजना करणे जरुरीचे आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस