शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Jammu & Kashmir: मोदी-शहांच्या 'मिशन काश्मीर'चा भाजपाला 'मिशन महाराष्ट्र'साठी महाफायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 08:51 IST

निर्णयाचा सगळ्यात मोठा लाभ महाराष्ट्राला होण्याची शक्यता

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : संसदेत घटनेतील कलम ३७० काढून टाकण्याची घोषणा करून भाजपने येऊ घातलेल्या चार विधानसभा निवडणुकांसाठीही आपला पाया बळकट करून घेतला आहे. या निर्णयाचा सगळ्यात मोठा लाभ महाराष्ट्राला होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात भाजपचा मित्रपक्ष शिवसेनाही मुख्यमंत्री पदावर आपला हक्क सांगत आहे. कलम ३७० काढून टाकण्यासोबत भाजपने हे राजकीय संकेत द्यायचा प्रयत्न केला आहे की, राष्ट्रीय एकतेबद्दल आम्ही कोणतीही तडजोड करीत नाही. भाजपला आशा आहे की, या उपायामुळे देशात आपली स्थिती भक्कम होईल आणि महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्याला खात्रीने यश मिळेल.कलम ३७० चा कोणता राजकीय प्रभाव पडू शकतो याचा अंदाज बहुधा शिवसेनेला तत्काळ आला. याच कारणामुळे शिवसेनेच्या नेत्यांनीच नव्हे तर त्याच्या वेगवेगळ्या कार्यालयांनीही मिठाई वाटून हा आनंद व्यक्त केला. भाजप आणि शिवसेना हे दोघेही हिंदू मतदारांना नजरेसमोर ठेवून आपली व्यूहरचना करतात. परंतु, कलम ३७० काढून टाकल्याची घोषणा भाजपने करून स्वत:ला बळकट करून घेतले. शिवसेनेच्या एका खासदाराने याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना या निर्णयाचा लाभ भाजपला मिळेल हे मान्य केले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना