शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवार-सोनिया गांधी यांच्यातील चर्चा अपूर्णच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 06:20 IST

राज्यातील सत्ताकोंडी कायम; काँग्रेसचा अंतिम निर्णय होणार दोन दिवसांनंतरच

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेनेसह सरकार स्थापन करण्याच्या विषयावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सोमवारी चर्चा केली. शिवसेनेला पाठिंबा देताना काही अटी निश्चित ठेवायला हव्यात, असे सोनिया यांनी पवार यांना सांगितले. त्यामुळे सरकारच्या स्वरूपाबद्दल काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत पुन्हा भेटणार असून, त्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे.आपल्याला सरकारमध्ये अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी शिवसेनेवर राष्ट्रवादी दबाव आणत आहे. राष्ट्रवादीपेक्षा १0 आमदार कमी असलेल्या काँग्रेसलाही अधिक प्रतिनिधित्व हवे असल्याने, त्यावर दोन्ही पक्षांत चर्चा होणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, दोन दिवसांत दोन्ही पक्षांच्या नेत्यांत चर्चा होईल. त्यानंतर, सोनिया गांधी निर्णय घेतील.या चर्चेमध्ये काँग्रेसतर्फे मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, अहमद पटेल, पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात सहभागी होतील. त्यासाठी राष्ट्रवादीचे काही नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. सोनिया गांधी शिवसेनेसोबत जाण्यास साशंक आहेत. काँग्रेसच्या आमदारांना सरकारमध्ये असावे, असे वाटते. त्यामुळे हिंदुत्ववादासारखे काही मुद्दे शिवसेनेने दूर ठेवावेत, असा काँग्रेसचा आग्रह असेल. कोणाचे किती मंत्री असावेत, मुख्यमंत्रिपद पूर्ण काळ शिवसेनेकडेच असावे का? उपमुख्यमंत्री किती असावेत, हे स्पष्ट झाल्यानंतरच काँग्रेस भूमिका स्पष्ट करेल.आपल्यात एकमत होईपर्यंत कोणीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर करू नये, असे सोनिया गांधी व शरद पवार यांच्यात ठरल्याचे समजते. बहुधा त्याचमुळे पवार यांनी आमची सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नाही, असे सांगितले असावे, शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील लहान पक्षांनाही सरकारमध्ये स्थान असावे आणि मुळात त्यांची भूमिका ऐकून घ्यावी, असेही या दोन नेत्यांमध्ये ठरले आहे.पवारांच्या भेटीला संजय राऊतसोनिया गांधी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांची शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. मात्र, त्यांनीही राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाविषयी चर्चा झाली, असेच सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना