शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: महाराष्ट्र सदनातील सुरक्षा वाढवली, सामान्यांना प्रवेशास बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 03:43 IST

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात आगमन झाल्यानंतर सदनाबाहेरची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात आगमन झाल्यानंतर सदनाबाहेरची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढविण्यात आली.महाराष्ट्रातील सत्तानाट्याचे विपरीत पडसाद राजधानीत उमटू नयेत, याची खबरदारी घेण्यात आली आहे. कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सुरक्षाव्यवस्थेत सकाळपासूनच कमालीची वाढ करण्यात आली.राज्यपाल व नायब राज्यपालांची दोनदिवसीय परिषद येथे सुरू आहे. त्यासाठी भगतसिंह कोश्यारी दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्र सदनात राज्यपालांचा मुक्काम असताना सुरक्षाव्यवस्था असते. मात्र, आज सदनाच्या आत, परिसरात आणि मुख्य प्रवेशद्वारावरही सुरक्षारक्षक उभे आहेत. राज्यपालांचे दुपारी ४ वाजता सदनात आगमत होताच, तिथे सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला.सदनातील कर्मचाऱ्यांसह मोजक्या लोकांना आत सोडले जात आहे. मुख्य प्रवेशद्वारासह सदनातून बाहेर पडणा-याचा मार्ग आणि फरिदकोट लेनच्या दिशेने असलेल्या फाटकावरही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.आतील लोकांचीही तपासणीराज्यपालांचा आणखी दोन दिवस दिल्लीत मुक्काम असणार आहे. तोपर्यंत तिथे प्रवेश मिळणे अवघड होईल. ज्यांचा आधीपासून सदनात मुक्काम आहे, त्यांचीही कसून तपासणी केली जात आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणNew Delhiनवी दिल्ली