शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

"घराणेशाही कशी वाचवायची हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 12:18 IST

काँग्रेसच्या या अभियानावरून आता भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी? असं म्हणत पाच खोचक सवाल विचारले आहेत.

काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी नागपुरात ‘हैं तैयार हम’ ही महारॅली होत आहे. बहादुरा येथील ‘भारत जोडो मैदाना’वर दुपारी दोन वाजता होणाऱ्या या महामेळाव्यात काँग्रेस लोकसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे.राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यसमितीचे देशभरातील नेते याप्रसंगी उपस्थित राहतील. रॅलीच्या आयोजनासाठी राज्यभरातील काँग्रेस नेते नागपुरात दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत.

काँग्रेसच्या या अभियानावरून आता भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी? असं म्हणत पाच खोचक सवाल विचारले आहेत. महाराष्ट्र भाजपाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मोहब्बत की दुकानच्या नावानं द्वेष पसरविण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?" असं म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे. तसेच पुन्हा हारण्यासाठी, मोहब्बत, करप्शनचं दुकान सुरू करण्यासाठी स्वागत आहे तुमचं असं देखील या पोस्टरवर म्हटलं आहे. 

"काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी?१) हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला साथ देण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?२) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?३) काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेली साडे तीनशे कोटींची रोकड अवैध मार्गानं कशी मिळवावी हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?४) मोहब्बत की दुकानच्या नावानं द्वेष पसरविण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?५) घराणेशाही कशी वाचवायची हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?" असं म्हणत भाजपाने काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. 

नाना पटोले यांनी सभास्थळी पत्रपरिषद घेत महारॅलीच्या आयोजनाची माहिती दिली. देशावर जेव्हा संकट येते तेव्हा नागपूरच्या भूमीतून काँग्रेसने एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था व संविधान धोक्यात आहे. ही व्यवस्था अबाधित राखणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे. महारॅलीतून परिवर्तनाचा संदेश दिला जाणार असल्याचे पटोले म्हणाले. जाती-धर्माच्या आडून लोकांमध्ये भांडणे लावून देश अधोगतीकडे नेला जात आहे.  विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण