पहिल्या राष्ट्रीय टारगेट बॉलमध्ये महाराष्ट्र अजिंक्य
By Admin | Updated: November 2, 2014 00:17 IST2014-11-01T23:14:38+5:302014-11-02T00:17:28+5:30
यजमानांना दुहेरी मुकुट

पहिल्या राष्ट्रीय टारगेट बॉलमध्ये महाराष्ट्र अजिंक्य
यजमानांना दुहेरी मुकुट
नाशिक - टारगेट बॉल फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र टारगेट बॉल फेडरेशनच्या वतीने आयोजित पहिल्या सब ज्युनिअर टारगेट बॉल राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपदावर यजमान महाराष्ट्राने पहिले नाव कोरले़ महाराष्ट्राच्या मुले तसेच मुली या दोन्ही संघांनी रोमहर्षक खेळ करत आपल्या गटात विजेतेपद पटकावले़
शहरातील केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत आज अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने उत्तर प्रदेश संघाचा पराभव करत अजिंक्यपद पटकावले़ उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा सामना पश्चिम बंगालशी झाला होता़ महाराष्ट्राने ४ गोलने सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर उत्तर प्रदेशने तेलगंणाचा ३ गोलने पराभव क रत अंतिम फेरी गाठली होती़ अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दोन गोलने सामना जिंकला़ उत्तर प्रदेशला दुसर्या स्थानावर समाधान मानावे लागले़ या सामन्यात महाराष्ट्राच्या कुणाल पवार, अर्षद शेख, मयुर बोरसे, कल्पेश पाटभल, हेमंत चौधरी, धनंजय आढाव, गेणश गवळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले़ तिसरे स्थान तेलंगणाला नमवत पश्चिम बंगालने राखले़
महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने अंतिम फेरीत बिहारच्या संघाचा १० गोलने पराभव करत एकहाती सामना जिंकून अजिंक्यपद पटकावले़ यामध्ये आश्विनी सूर्यवंशी, सेजल लोमटे, निशा माळी, पल्लवी सुरशे यांनी उत्कृष्ट खेळ केला़ मुलींच्या गटात उत्कृष्ट खेळाडूचा किताब आश्विनी सूर्यवंशी हिने पटकावला, तर मुलांच्या गटात नंदुरबारचा कुणाल पवार याला हा पुरस्कार मिळाला़ या स्पर्धेतून देशाचा संघ निवडण्यात येणार असून, भुतान येथे होणार्या आंतरराष्ट्रीय टारगेट बॉल स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे़
महापौर अशोक मुर्तडक व उपस्थितांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले़ यावेळी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सभापती ॲड़ नितीन ठाकरे, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ़ सुनील ढिकले, राज्य टारगेट बॉल संघटनेचे अध्यक्ष प्रकाश दायमा, प्रा़ दिलीप धोंडगे, सोनू शर्मा, साहेबराव पाटील, मीनाक्षी गायधनी, एस़ एम़ कोर, संजय होळकर, अनिल वर्पे, मयुर ठाकरे आदि उपस्थित होते़
फोटो क्रमांक - 01पीएचएनओ11
फोटो ओळी - विजेत्या महाराष्ट्राच्या संघाला पारितोषिक देताना महापौर अशोक मुर्तडक, ॲड़ नितीन ठाकरे, राहुल ढिकले़ समवेत संघटनेचे पदाधिकारी़