आपापसांतील तंटे तडजोडीने मिटवावेत महालोक अदालत : जिल्हा न्यायधीश पी़के़ शर्मा यांचे प्रतिपादन ककक

By Admin | Updated: December 14, 2014 00:44 IST2014-12-14T00:44:46+5:302014-12-14T00:44:46+5:30

अहमदपूर : आपापसांतील भांडणं, तंटे, वाद, प्रतिवाद मिटविण्यासाठी वेळ व पैशाचा अपव्यय होतो़ परिणामी, विकास थांबतो़ त्यामुळे जागरूक नागरिकांनी आपापसातील तंटे तडजोडीने मिटवावेत, असे प्रतिपादन जिल्हा न्या़ पी़के़ शर्मा यांनी येथे शनिवारी केले़

Mahalok court clears disputes among themselves: District Judge PK Sharma | आपापसांतील तंटे तडजोडीने मिटवावेत महालोक अदालत : जिल्हा न्यायधीश पी़के़ शर्मा यांचे प्रतिपादन ककक

आपापसांतील तंटे तडजोडीने मिटवावेत महालोक अदालत : जिल्हा न्यायधीश पी़के़ शर्मा यांचे प्रतिपादन ककक

मदपूर : आपापसांतील भांडणं, तंटे, वाद, प्रतिवाद मिटविण्यासाठी वेळ व पैशाचा अपव्यय होतो़ परिणामी, विकास थांबतो़ त्यामुळे जागरूक नागरिकांनी आपापसातील तंटे तडजोडीने मिटवावेत, असे प्रतिपादन जिल्हा न्या़ पी़के़ शर्मा यांनी येथे शनिवारी केले़
अहमदपूर येथील न्यायालयात शनिवारी नवी दिल्ली उच्च न्यायालय आणि तालुका विधी सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय महालोक अदालत कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी न्या़ पी़ बी़ जाधव, न्या़ एस़ व्ही़ पोतदार, न्या़ एस़ एस़ शिंदे, न्या़ एऩ आऱ मनगीरे, न्या़ व्ही़ आय़ खान, ॲड़ भगवानराव पौळ, ॲड़ वसंतराव फड यांची उपस्थिती होती़
पुढे न्या़ शर्मा म्हणाले, भांडणं, तंट्यामुळे संबंध दुरावतात़ परिणामी, गैरसमज वाढतात़ न्यायालयाच्या निकालामुळे एक पक्षकार नाराज होतो़ पण या महाअदालतीमुळे दोघांमध्ये समेट होऊन खटल्याचा निपटारा होतो, असेही ते म्हणाले़ यावेळी ॲड़ टी़ एऩ कांबळे, ॲड़डी़ एल़ घोगरे, ॲड़ व्ही़ जे़ कोरे, ॲड़ सांब शेटकार, ॲड़ बसवराज कुमदाळे, ॲड़ एस़एस़देमगुंडे यांच्यासह विविध बँकेेचे अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते़ सूत्रसंचालन ॲड़ व्ही़जी़भोसले यांनी केले़ आभार ॲड़ सुनील केंद्रे यांनी मानले़

Web Title: Mahalok court clears disputes among themselves: District Judge PK Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.