शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे...", ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:53 IST

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांच्या महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे, या विधानाला भाजप मोठ्या प्रमाणावर मुद्दा बनवू शकते.

Mamata Banerjee :  उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. या महाकुंभमेळ्याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत भाषण करताना म्हटले की, महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे. महाकुंभाच्या आयोजनासाठी योग्य नियोजन करण्यात आले नाही. तसेच, व्हीआयपी लोकांना विशेष सुविधा देण्यात आल्या, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. ममता बॅनर्जी या २०११ पासून सतत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी  भाजप  सतत प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता ममता बॅनर्जी यांच्या महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे, या विधानाला भाजप मोठ्या प्रमाणावर मुद्दा बनवू शकते.

अलिकडेच, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी महाकुंभमेळ्याला फालतू म्हटले होते. लालू प्रसाद यादव यांना माध्यमांनी महाकुंभमेळ्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, कुंभ…कुंभ..कुंभ… कुंभला काही अर्थ नाही आहे. फालतू आहे कुंभ अशी टीका लाल प्रसाद यादव यांनी केली. 

लालू प्रसाद यादव यांच्या या वक्तव्याला भाजपने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रवक्ते प्रभाकर मिश्रा यांनी राबडी देवी छठ करताना गंगेत डुबकी मारत नाहीत का, असा सवाल केला आहे. तसेच, त्यांचे कुटुंबीय काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जात नाहीत का? याच वर्षी त्यांचे लाखो अनुयायी कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी गेले होते. लालू प्रसाद यादव यांनी या सर्वांचा अपमान केला.

याचबरोबर, महाकुंभमेळ्यातील व्हीआयपी कल्चरवरून अनेक विरोधी नेते योगी आदित्यनाथ सरकारवर सतत हल्लाबोल करत आहेत. तसेच, धर्मग्रंथांमध्ये १४४ वर्षे जुन्या महाकुंभाचा उल्लेख नाही, असे समाजवादी पक्षाचे सरचिटणीस शिव गोपाल यादव यांनी म्हटले आहे. दरम्यान, प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन २६ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. आतापर्यंत ५५ कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभमेळ्यात स्नान केले आहे. 

दोनदा चेंगराचेंगरी महाकुंभमेळ्यादरम्यान आतापर्यंत दोन वेळा चेंगराचेंगरी झाली आहे. २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येनिमित्त कुंभमेळ्यात  झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला होता तर ६० जण जखमी झाले होते. यानंतर, १५ फेब्रुवारीच्या रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरही चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीPrayagrajप्रयागराजKumbh Melaकुंभ मेळाwest bengalपश्चिम बंगाल