शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या माणसांचा शोध! आई बेपत्ता तर कोणी पत्नी गमावली...; चेंगराचेंगरीनंतर कुटुंबीयांचा टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 18:04 IST

मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे चेंगराचेंगरीनंतर अनेक लोक बेपत्ता आहेत.

प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे चेंगराचेंगरीनंतर अनेक लोक बेपत्ता आहेत. नातेवाईक आपल्या माणसांचा शोध घेण्यासाठी एका रुग्णालयापासून दुसऱ्या रुग्णालयात भटकत आहेत. यामध्ये अनेकांनी आपली पत्नी, मुलगी, पती, सासू, काका असे कुटुंबातील सदस्य गमावले आहेत. 

आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या शोधात प्रयागराजमधील मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचलेल्या बिहारमधील सासाराम येथील रहिवासी द्वारिका सिंह यांनी सांगितलं की, ते त्यांच्या पत्नी आणि दोन मेहुण्यांसह मौनी अमावस्येला स्नान करण्यासाठी कुंभमेळ्याला आले होते. मध्यरात्रीनंतर अचानक चेंगराचेंगरी झाली आणि  पत्नीसह सर्वजण वेगळे झाले. द्वारिका सिंह यांनी चेंगराचेंगरीची घटना सांगितली. तसेच ते आपल्या प्रियजनांच्या शोधात एका हॉस्पिटल दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये कसे भटकत होते हे देखील सांगितलं.

रोहतास (बिहार) येथील रहिवासी दीपक कुमारची आई देखील स्नान करण्यासाठी आली होती आणि आता ती बेपत्ता झाली. तिचा ठावठिकाणा अद्याप कळलेला नाही. दुसरीकडे दीपक त्याच्या आईला शोधत घरोघरी फिरत आहे, मोबाईलवर तिचा फोटो दाखवत आहे.

मनोज कुमार यांचे भाऊ आणि मेहुणी, जे बिहारचे रहिवासी आहेत, ते देखील मौनी अमावस्येच्या दिवशी स्नानासाठी आले होते आणि अद्याप घरी परतलेले नाहीत. मनोज कुमार त्यांच्या शोधात प्रयागराजला पोहोचले. रुग्णालयात ते त्यांचा शोध घेत आहे.

"मी ओरडत होते मला वाचवा..."; महाकुंभ चेंगराचेंगरीत आई, आजीचा मृत्यू, डोळे पाणावणारी घटना

उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील दोन महिलांचाही मृत्यू झाला. ज्यांचे कुटुंबीय अजूनही मृतदेह मिळण्याची वाट पाहत आहेत. जौनपूर येथील रहिवासी जगवंती देवी आपल्या कुटुंबासह मौनी अमावस्येला स्नान करण्यासाठी आल्या होत्या. पण या चेंगराचेंगरीत जगवंती देवींनी त्यांची वहिनी आणि आई गमावली. 

जगवंती देवी म्हणाल्या की, जेव्हा ही दुर्घटना झाली तेव्हा आमच्या वहिनी म्हणाल्या - माझ्या मुलीला वाचवा. कोणीतरी माझ्या ७ वर्षांच्या भाचीला बाहेर फेकून दिलं आणि ती बांबूच्या बॅरिकेडला धरून बराच वेळ त्यावर लटकून राहिली. तेव्हाच तिचा जीव वाचला. पण आमच्या वहिनी आणि आईला वाचवता आलं नाही.भाची म्हणाली, "मीही ओरडत होते मला वाचवा... मला वाचवा... पण कोणीही मला वाचवत नव्हतं." 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPrayagrajप्रयागराज