महेबूब मुक्तारला राष्ट्रपती पुरस्कार

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:13+5:302015-02-14T23:51:13+5:30

फुलवळ : येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी महेबुब मुक्तार अहेमद शेख याची राष्ट्रपती स्काऊट गाईड पुरस्कारासाठी निवड झाली.

MAHABUB OPRALLA RASHTIR PRIZE | महेबूब मुक्तारला राष्ट्रपती पुरस्कार

महेबूब मुक्तारला राष्ट्रपती पुरस्कार

लवळ : येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी महेबुब मुक्तार अहेमद शेख याची राष्ट्रपती स्काऊट गाईड पुरस्कारासाठी निवड झाली.
१६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार दिल्या जाणार आहे. स्काऊटचे शिक्षक करेवाड यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. याबद्दल मुख्याध्यापक के.एम. पांडागळे, संस्थेचे अध्यक्ष वैजनाथ सादलापुरे, शिक्षण समितीचे अध्यक्ष बसवेश्वर मंगनाळे, जि.प. सदस्या वर्षा भोसीकर आदींनी स्वागत केले.

पाच कर्मचार्‍यांवर गुन्हा
मुखेड : निवडणूक कामात गैरहजर राहणार्‍या पाच कर्मचार्‍यांवर गुन्हे नोंदविण्यात आले. निळकंठ माधवराव चौंडे (मुख्याध्यापक जि.प.प्रा.शा. निळा ता. नांदेड), प्रकाश बाबू भारडे (सहशिक्षक जि.प.प्रा.शा. सावळी ता. बिलोली), पुंडलिक हरि नाईक (सहशिक्षक जि.प. हा. धर्माबाद), मिथून बाबुलाल मंडलेवाल (सहशिक्षक जि.प.प्रा.शा. मनसकरगा ता.देगलूर), दत्ता शंकर रेडेवाड (ग्रामसेवक पं.स. नायगाव) यांचा समावेश आहे.

Web Title: MAHABUB OPRALLA RASHTIR PRIZE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.