महाबली हनुमानालाच सरकारी नोटिशीचा शेंदूर!

By Admin | Updated: June 10, 2015 08:44 IST2015-06-10T01:18:56+5:302015-06-10T08:44:25+5:30

भिंड जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी भीमरूपी महारूद्र मानल्या जाणाऱ्या बजरंगबलीलाच नोटीस बजावली असून मंदिर खाली करा, असा आदेश दिला आहे.

Mahabali Hanumanam Government Notices of Shendur! | महाबली हनुमानालाच सरकारी नोटिशीचा शेंदूर!

महाबली हनुमानालाच सरकारी नोटिशीचा शेंदूर!

भिंड ( मध्य प्रदेश) : सार्वजनिक जागेवर केलेले अतिक्रमण काढून घ्यावे यासाठी माणसांना नोटीस देता देता आता मध्य प्रदेशाातील भिंड जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी भीमरूपी महारूद्र मानल्या जाणाऱ्या बजरंगबलीलाच नोटीस बजावली असून मंदिर खाली करा, असा आदेश दिला आहे. भिंड नगरपालिकेच्या प्रशासनाने ही नोटीस पुजाऱ्याऐवजी हनुमानाच्या नावेच मंदिराच्या दारावर चिकटविण्याचा प्रताप केला आहे. भिंडमधील छोटी बजरिया भागात हे मंदिर आहे. या धार्मिक स्थळाने सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले असून एक आठवड्यात ते काढून घ्यावे, असे प्रत्यक्ष हनुमानजींना बजावण्यात आले आहे.
ही घोडचूक आहे असे म्हणत प्रशासन पळवाट काढू पाहात असले तरी नोटीस बजावणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणे आता अटळ आहे. हनुमान प्रभूंच्या नावे ही नोटीस बजावणे ही चूक आहे़ इतर अतिक्रमणाच्या नोटीस बजावताना ही चूक झाली, असे भिंड मनपाचे अतिक्रमण विरोधीपथकाचे प्रमुख धीरेश तिवारी यांनी म्हटले आहे. मनपाचे मुख्य अधिकारी आऱ एस़ चारी यांनी या चुकीसाठी तिवारी यांनाच जबाबदार धरले असून, त्यांच्यावर चौकशीची नोटीस बजावली आहे. पण चौकशीची प्रक्रिया मारुतीच्या शेपटासारखी लांबणार काय, हाही कुतूहलाचा विषय बनला आहे. या अजब नोटिशीत हनुमानांनी ८ बाय १० फूट जागा कचरा काढून मोकळी करावी. आपण होऊन ही जागा खाली न केल्यास नगरपालिका हे अतिक्रमण तोडून टाकेल व कचरा स्वच्छ केला जाईल़ येणारा खर्च मंदिराकडून वसूल केला जाईल, असे बजावले आहे़ अतिक्रमणे स्वच्छ करण्यासाठी मनपाने २१८ नोटिशी बजावल्या आहेत. याचिका दाखल झाल्यानंतर मनपाला जाग आली.

कारवाईच्या खर्चाची मंदिराकडून वसुली
या धार्मिक स्थळाने सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले असून , एक आठवड्यात ते काढून घ्यावे, असे प्रत्यक्ष हनुमानजींना बजावण्यात आले आहे.

हनुमानांनी ८ बाय १० फूट जागा कचरा काढून मोकळी करावी. आपण होऊन ही जागा खाली न केल्यास नगरपालिका हे अतिक्रमण तोडून टाकेल व कचरा स्वच्छ केला जाईल़ येणारा खर्च मंदिराकडून वसूल केला जाईल.

Web Title: Mahabali Hanumanam Government Notices of Shendur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.