विकासाचे ‘महा’ मार्ग अन् सोलापूर ़़़शिवाजी फोकस
By Admin | Updated: May 15, 2015 23:33 IST2015-05-15T23:33:03+5:302015-05-15T23:33:03+5:30
एक-दोन नव्हे तब्बल चार राष्ट्रीय महामार्गांची कामे सोलापुरात सुरू झाली आहेत़ सोलापूर-पुणे महामार्गाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आह़े सोलापूर-तुळजापूर-येडशी हे काम गतीने सुरू आह़े सोलापूर-हैदराबादचे कामदेखील सुरू झाले आह़े येत्या काही महिन्यांत सोलापूर-विजापूरचे काम सुरू होईल, त्यामुळे ‘महामार्गांचे सोलापूर’ अशी ओळख सोलापूरची होईल़ येत्या दोन वर्षांत ही कामे जवळपास पूर्ण होतील ़ बा?रुप चांगले होत असताना सोलापूर शहराबद्दल खूप चिंताजनक वातावरण आह़े त्यामुळे रस्ते, पाणी, ड्रेनेज या पायाभूत सुविधांवर लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करणे खूप आवश्यक आह़े

विकासाचे ‘महा’ मार्ग अन् सोलापूर ़़़शिवाजी फोकस
ए -दोन नव्हे तब्बल चार राष्ट्रीय महामार्गांची कामे सोलापुरात सुरू झाली आहेत़ सोलापूर-पुणे महामार्गाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आह़े सोलापूर-तुळजापूर-येडशी हे काम गतीने सुरू आह़े सोलापूर-हैदराबादचे कामदेखील सुरू झाले आह़े येत्या काही महिन्यांत सोलापूर-विजापूरचे काम सुरू होईल, त्यामुळे ‘महामार्गांचे सोलापूर’ अशी ओळख सोलापूरची होईल़ येत्या दोन वर्षांत ही कामे जवळपास पूर्ण होतील ़ बा?रुप चांगले होत असताना सोलापूर शहराबद्दल खूप चिंताजनक वातावरण आह़े त्यामुळे रस्ते, पाणी, ड्रेनेज या पायाभूत सुविधांवर लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करणे खूप आवश्यक आह़े सोलापूर ते पुणे हा महामार्ग चौपदरीकरण झाल्यापासून सोलापूरच्या प्रगतीची चर्चा सुरू झाली़ पुणे अगदी जवळ आल्यामुळे शहरात सकारात्मक चर्चा सुरू झाली़ 32 साखर कारखाने असलेल्या जिल्?ाची र्शीमंतीदेखील दिसू लागली आह़े त्यातच महामार्गांच्या विकासाची कामे केंद्राकडून मंजूर झाल्यामुळे भविष्यात शहर कसे दिसेल याचे आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आह़े एकीकडे स्मार्ट सिटीची चर्चा सुरू असताना आर्थिकदृष्ट्या अत्यंत बिकट परिस्थितीतून वाटचाल करणार्या सोलापूर महापालिकेची दयनीय अवस्था झाली आह़े महामार्गावरुन सुसाट वेगाने यायचे आणि शहरात वाहतुकीची कोंडी, पाण्याचा प्रश्न या गोष्टींना सामोरे जाणे चांगले दिसणार नाही़ त्यामुळे शहरातील इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्याकडे आता भर दिला पाहिज़े वाढलेली लोकसंख्या, अरुंद रस्ते, चुकलेले शहरविकासाचे नियोजन, पाण्याची बोंब आणि मनपा तिजोरीत खडखडाट यामुळे महामार्ग चौपदरीकरण आणि चकाचक होतील परंतु शहराचे काय? हा प्रश्न चिंतेचा आह़े जुनी महापालिका, मोठा इतिहास असणारे शहर, गिरण्यांचे शहर, कामगारांचे शहर या बाबी आता बोथट झाल्या आहेत़ ‘विकासाचे बोला़़़’ असे तरुणाई विचारत आहे, त्यामुळे बदललेल्या परिस्थितीनुसार मनपा प्रशासन आणि शहरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी शहरातील समस्या सोडविण्यावर भर दिला पाहिज़े दळणवळणाची साधने असणे ही शहराच्या प्रगतीची लक्षणे आहेत़ महामार्गांचे जाळे होत आह़े रेल्वेचे जाळे चांगले आह़े एनटीपीसी प्रकल्प आकार घेत आह़े सोलापूर शहर हे सध्या विकासाच्या टर्निंग पॉइंटवर आह़े त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधा विकसित करणे आणि विमानसेवा सुरू करणे उद्योगवाढीसाठी गरजेचे आहे हे निश्चित़शिवाजी सुरवसेफोकस कॉलममध्ये महामार्गाचा फोटो वापरण़े़़़