वीज कामगारांचे महाअधिवेशन
By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:08+5:302015-04-04T01:55:08+5:30
वीज कामगारांचे महाअधिवेशन

वीज कामगारांचे महाअधिवेशन
व ज कामगारांचे महाअधिवेशनमुंबई : महाराष्ट्र स्टेट इलेकट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन १० ते १२ एप्रिल रोजी तीन दिवस कोकणातील कुडाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यातील ८५ हजार कामगार, अभियंते, अधिकारी सभासदामधून निवडलेल्या सहाशे प्रतिनिधी व शंभर निरिक्षकासह, महिला प्रतिनिधी अधिवेशनात सहभागी होणार आहेत. वीज कामगारांच्या समस्या, खासगीकरणाचे धोरण याबाबत फेडरेशनने तीन समितींच्या अध्यक्षतेखाली अहवाल तयार केला आहे. आणि तो अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. कॉ. चक्रधरप्रसाद सिंग, कॉ. ए.बी. बर्धन, कॉ. गुरुदास गुप्ता हे अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनादरम्यान विद्युत कायद्यातील सुधारणा, कामगार कायद्यातील बदल या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.