शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

कुंभमेळ्यात पहिल्याच दिवशी १.५ कोटी भाविकांचे पवित्र स्नान, शंखध्वनीने झाली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 06:43 IST

Maha Kumbh 2025 : जगातील सर्वात मोठ्या धार्मिक संमेलनाला लाखो भाविकांच्या साक्षीने प्रारंभ; ४५ दिवसांत ४० कोटी भाविक येण्याची शक्यता 

- राजेंद्र कुमार  

Maha Kumbh 2025 :  महाकुंभ नगर (उत्तर प्रदेश): जगातील सर्वात मोठे धार्मिक संमेलन असलेल्या महाकुंभ मेळ्यास सोमवारपासून प्रारंभ झाला. प्रयागराज येथे संगमस्थळावर नद्यांच्या पापकर्मापासून मुक्ती, तसेच मोक्ष मिळविण्याच्या इच्छेने सुमारे १.५ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले. हा मेळा सुमारे ४५ दिवस चालणार असून, त्या कालावधीत तिथे देश-विदेशातून ४० कोटी लोक येण्याची शक्यता आहे.

दर १२ वर्षांनी महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. १४४ वर्षापूर्वीच्या महाकुंभ मेळ्यात जशी ग्रहस्थिती होती, अगदी तशी स्थिती यंदाच्या वर्षी असल्याचे साधुसंतांचे मत आहे. 'पौष पोर्णिमेच्याच्या दिवशी शंखध्वनी आणि भजनांच्या गजरात या प्रसिद्ध मेळ्याचा औपचारिक प्रारंभ झाला. त्यापाठोपाठ साधुसंतांनी जय गंगा मैय्या अशा घोषणा देत पवित्र स्नान केले. १३ आखाड्यांचे साधू महाकुंभमेळ्यात आले आहेत.

'हर हर महादेव', 'जय गंगा मय्या'चा गजरप्रयागराज येथील संगमावर स्नान करताना लोक 'जय श्री राम, हर हर महादेव आणि जय गंगा मध्याच्या घोषणा देत होते. देशभरातील विविध संप्रदायांतील लोक प्रयागराजच्या विविध घाटांवर पवित्र स्नान करताना दिसत होते. हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर येथील कैलाश नारायण शुक्ला है भाविक म्हणाले की, महाकुंभ मेळ्यामध्ये भक्तांसाठी उत्तम व्यवस्था केली आहे. 

'हा श्रद्धा, भक्ती व संस्कृतीचा सोहळा' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, यंदाच्या वर्षी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला सोमवारी प्रारंभ झाला. श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या या पवित्र सोहळ्यात असंख्य लोक सामील होतात. महाकुंभ मेळा भारताच्या शाश्वत आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे, विविधतेतील एकतेचे दर्शन मेळ्यातून होत आहे. 

पवित्र स्नान करण्यासाठी जगभरातून आले हजारो विदेशी नागरिक पवित्र स्नान करण्यासाठी लोटलेल्या लाखो लोकांमध्ये विदेशी नागरिकांचाही लक्षणीय सहभाग होता. अमेरिकी लष्करातील माजी सैनिक व आता बाबा मोक्षपुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायकेल यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी सांगितले की, माझ्या कुटुंबाचे भरणपोषण तसेच करिअर घडविणे, या गोष्टी करण्यात आल्या. इतरांप्रमाणे मीही मग्न होतो. पण, जीवनात काहीही शाश्वत नाही, असे मला एका क्षणी वाटू लागले. त्यानंतर मी मोक्षाच्या शोधात निघालो.

तरुण साध्वीचा व्हिडीओ चर्चेत महाकुंभात दिसायला अतिशय सुंदर आणि तरुण असणाऱ्या साध्वीचा व्हिडीओ चर्चेत आहे. या साध्वीचे नाव हर्षा रिचारिया आहे. ती ३० वर्षांची आहे, ती उत्तराखंडची आहे. तिने दोन वर्षांपूर्वीच दीक्षा घेतली आहे. आत्मिक शांतता मिळावी म्हणून तिने साध्वी होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. दरम्यान, मुलाखत घेणाऱ्या एका युट्यूबरने भलताच प्रश्न विचारल्याने एका साधूने त्याला चिमट्याने मारल्याचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

महात्मा गांधींनी संगमामध्ये केले होते पवित्र स्नान प्रयागराजच्या क्षेत्रीय कार्यालयातील अभिलेखागारातील माहितीनुसार, १९१८ साली आयोजिलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये महात्मा गांधी यांनी पवित्र स्नान केले होते. त्यावेळी त्यांनी साधूसंतांशी संवाद साधला होता. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही एकदा प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्याला भेट दिली होती.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश