शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वी हर्षा रिछारिया, ग्लॅमरस फोटोंवरून ट्रोल होताच म्हणाली, "मी अजूनही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:37 IST

Maha Kumbh 2025: अलिकडेच हर्षा रिचारियाला तिच्या जुन्या फोटोंवरून ट्रोल करत युजर्सनी तिच्या पूर्वीच्या जीवनशैलीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावरून हर्षाने प्रतिक्रिया दिली आहे.

महाकुंभ अथवा कुंभमेळा २०२५ मध्ये, देश आणि जगभरातून लाखो भाविक पवित्र स्नान करण्यासाठी संगमावर पोहोचले आहेत. यावेळी निरंजनी आखाड्याची कथित साध्वी हर्षा रिचारियानेही स्नान केले आणि आपल्या यात्रेसंदर्भात भाष्य केले. हर्षा म्हणाली, गंगा-संगमात स्नान करणे हा एक अतिशय महत्त्वाचा अनुभव आहे, जो प्रत्येक भारतीयासाठी विशेष आहे. हे स्नान आमच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि या संधीचा फायदा घेतल्याबद्दल मला अभिमान वाटतो."

अलिकडेच हर्षा रिचारियाला तिच्या जुन्या फोटोंवरून ट्रोल करत युजर्सनी तिच्या पूर्वीच्या जीवनशैलीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावरून हर्षाने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “मी लहानपणापासूनच साध्वी असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. मी अजूनही साध्वी नाही. मी या दिशेने वाटचाल करत आहे. सोशल मीडिया आणि लोकांनी मला साध्वी हर्षाचा टॅग दिला." 

हर्षा एबीपी न्यूजसोबत बोलताना पुढे म्हणाली, "मी पुन्हा पुन्हा स्पष्ट करते की साध्वी असणे ही एक मोठी गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीला साध्वी बनवण्यासाठी अनेक परंपरा, अनेक विधी करून घ्यावे लागतात. मी काहीही केलेले नाही, मी केवळ मंत्रदीक्षा घेतली आहे आणि ती कोणीही घेऊ शकते. जी गृहस्त जीवनातही घेतली जाऊ शकते. मी पूर्वी एक एंटरटेनर होते. मात्र आता मी माझ्या आयुष्यासाठी हा नवीन मार्ग निवडला आहे आणि मला त्यात काहीही चुकीचे वाटत नाही."

जुने फोटो डेलीट न करण्याचाही खुलासा केला -माझे जुने फोटो बघितले जात आहेत... मी सांगते की, मी अँकरिंग क्षेत्रातूनच आले आहे. यात काय अडचण आहे? प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो, जुने आयुष्य असते. मी माझे सर्व जुने व्हिडिओ आणि फोटो डेलीटही करू शकले असते. पण मी ते केले नाही. कारण मला माझा प्रवास तरुणांसमोर मांडायचा आहे की, जर मी एवढा प्रवास करू शकले, तर मला वाटते, कोणीही हे करू शकते," अशेही हर्षाने म्हटले आहे.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळा