कर्नाटकमध्ये मॅगी पास...
By Admin | Updated: October 19, 2015 17:22 IST2015-10-19T17:22:56+5:302015-10-19T17:22:56+5:30
चार महिन्यांच्या बंदीनंतर कर्नाटक सरकार बच्चेकंपनीच्या आवडत्या मॅगी नूडल्सवरील बंदी हटवली आहे. लीड व मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण मर्यादेत असल्यामुळे बंदी उठवण्यात आली आहे.

कर्नाटकमध्ये मॅगी पास...
ऑनलाइन लोकमत
कर्नाटक, दि. १९ - चार महिन्यांच्या बंदीनंतर कर्नाटक सरकार बच्चेकंपनीच्या आवडत्या मॅगी नूडल्सवरील बंदी हटवली आहे. लीड व मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण मर्यादेत असल्यामुळे बंदी उठवण्यात आली आहे. लोकांचे आरोग्य धोक्यात जाऊ नये यासाठी फूड सेफ्टी स्टँडर्ड ऍथॉरिटी ऑफ इंडियाने मॅगी नूडल्यच्या निर्मीती आणि विक्रिवर बंदी घातली होती. पण कर्नाटक सरकारने राज्यातील प्रयोगशाळांच्या तपासणीत हानीकारक घटक आढळले नसल्याने राज्यातील मॅगीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
मॅगीमध्ये शिशाचे अंश आढळून आल्याने त्यावर देशभरात बंदी घालण्यात आली आहे. वादग्रस्त ठरलेल्या मॅगीची कोलकाता येथील प्रयोगशाळेत तपासणी केली असता. आवश्यकतेपक्षा अधिक लीड व मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण आढळून आल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यामुळे त्याची पुन्हा तपासणी करण्यात आली. तपासणीत मॅगी पास झाल्यामुळे कर्नाटक सरकारने बंदी हटवली आहे.