मदुराईत बस- ट्रक यांच्यात अपघात, १३ ठार
By Admin | Updated: February 6, 2016 20:34 IST2016-02-06T20:34:28+5:302016-02-06T20:34:28+5:30
तामीळनाडूतील मदुराईमध्ये बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात १३ जण ठार झाले असून २७ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

मदुराईत बस- ट्रक यांच्यात अपघात, १३ ठार
>ऑनलाइन लोकमत
मदुराई, दि. ६ - तामीळनाडूतील मदुराईमध्ये बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात १३ जण ठार झाले असून २७ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मदुराई शहरापासून ४० किलो मीटर अंतरावर असलेल्या टी कल्लीपट्टी येथे तामीऴनाडून राज्य परिवहन मंडळाची बस आणि ट्रक यांच्यात शनिवारी दुपारी अपघात झाला. या अपघातात १३ जण ठार झाले असून २७ जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन मंडळाची बस तिरुनेल्वेलीहून कुमीलीला जात असताना टी कल्लीपट्टी येथे हा अपघात घडला. यामध्ये १३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.