मदरशामध्ये उस्ताद मुलांचा लैंगिक छळ करायचा, महिला पत्रकाराचा गौप्यस्फोट

By Admin | Updated: November 26, 2015 11:23 IST2015-11-26T11:23:28+5:302015-11-26T11:23:28+5:30

मदरशामध्ये मुलांचा लैंगिक छळ केल्याच्या घटना फेसबुकवर उघड करणा-या केरळमधल्या महिला पत्रकाराला ऑनलाइन धमक्यांचा सामना करावा लागत असून

Madrasa, sexual harassment of young children, sexual assault of woman journalist | मदरशामध्ये उस्ताद मुलांचा लैंगिक छळ करायचा, महिला पत्रकाराचा गौप्यस्फोट

मदरशामध्ये उस्ताद मुलांचा लैंगिक छळ करायचा, महिला पत्रकाराचा गौप्यस्फोट

>ऑनलाइन लोकमत
कोझिकोडे, दि. २६ - मदरशामध्ये मुलांचा लैंगिक छळ केल्याच्या घटना फेसबुकवर उघड करणा-या केरळमधल्या महिला पत्रकाराला ऑनलाइन धमक्यांचा सामना करावा लागत असून तिच्या बाजुनेही अनेकांनी कॉमेंट्स केल्या आहेत.
व्ही. पी. राजिना असे या पत्रकाराचे नाव असून केरळमधल्या स्थानिक वृत्तपत्रासाठी काम करते. मदरशामधले लहानपणचे अनुभव फेसबुकवर शेअर करताना तिने उस्ताद, मुलांच्या खासगी अवयवांना स्पर्श करायचा व कुणी काही विचारलेच तर अश्लील उत्तरे द्यायचा अशी आठवण सांगितली आहे. तसेच चौथीमधल्या मुलींच्या शरीराशीही उस्ताद अश्लील चाळे करायचा असे राजिनाने म्हटले आहे. 
या छळाला कंटाळून अनेक मुलामुलींनी मदरसा सोडल्याची आठवण राजिनाने सांगितली आहे. राजिनाच्या या वादग्रस्त फेसबुक पोस्टला समर्थक तसेच विरोधकांचा प्रचंड भडीमार झाला आहे. 
अर्थात, राजिना हिने ऑनलाइन धमक्यांना न घाबरता मी सत्य काय ते कथित केलं असून अल्ला माझ्या बाजुने असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Madrasa, sexual harassment of young children, sexual assault of woman journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.