शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:26 IST

तरुणाने सांगितलं की, त्याने ५ महिन्यांपूर्वी इंदूरमधील सिमरोल गावातील यशवीशी प्रेमविवाह केला होता.

मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात एक अनोखी घटना समोर आली आहे. हातात फलक घेऊन तरुण दोन महिन्यांपासून आपल्या पत्नीचा शोध घेत आहे. पतीने गंभीर आरोप केला आहे की, त्याच्या सासरच्यांनी त्याच्या पत्नीचं अपहरण केलं आहे.

धर्मेंद्र नागराज असं या तरुणाचं नाव आहे. धर्मेंद्रच्या पत्नीचं दोन महिन्यांपूर्वी अपहरण झालं होतं आणि त्याला त्याच्या सासरच्या लोकांवर संशय आहे. हातात एक फलक घेऊन तो त्याच्या हरवलेल्या पत्नीला शोधण्यासाठी मदत मागत आहे.

तरुणाने सांगितलं की, त्याने ५ महिन्यांपूर्वी इंदूरमधील सिमरोल गावातील यशवीशी प्रेमविवाह केला होता. दोन महिन्यांपूर्वी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता काही अज्ञात लोक कारमधून आले आणि त्यांनी पत्नी यशवीचं अपहरण केलं. प्रेमविवाहामुळे सासरच्या मंडळींना राग आला होता आणि त्यांनी पत्नीला परत घेऊन जाण्याची धमकी दिली होती. घटनेनंतर धर्मेंद्रने छिपाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सीएम हेल्पलाइन १८१ आणि एसपी ऑफिसमध्येही तक्रार केली, पण कोणतीही कारवाई झाली नाही.

२ महिन्यांपूर्वी अचानक पत्नीचं अपहरण

धर्मेंद्रने सांगितलं की, ५ वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर दोघांची मैत्री झाली. यानंतर दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. ५ वर्षांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झाल्यानंतर, दोघांनीही घरातून पळून जाऊन आर्य समाज मंदिरात लग्न केलं. लग्नानंतर दोघेही आनंदाने आयुष्य जगत होते, पण २ महिन्यांपूर्वी अचानक पत्नीचं अपहरण झालं. पोलीसही या प्रकरणात मदत करत नाहीत. 

"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"

पती म्हणतो की,  त्याला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता. २४ फेब्रुवारीच्या रात्री १ वाजता धर्मेंद्रला एका अनोळखी नंबरवरून यशवीचा मेसेज आला. यशवीने मेसेजमध्ये लिहिलं होतं, मला घेऊन जायला ये, हे लोक मला घेऊन आले आहेत. तिने मेसेजमध्ये घराचा पत्ताही लिहिला. एकटा येऊ नकोस, पोलिसांनाही सोबत घेऊन ये कारण इथे खूप गुंड आहेत असा सल्लाही दिला. तिने असंही सांगितले की तिचं सकाळी ९ वाजेपर्यंत तिचं दुसरं लग्न लावलं जाईल आणि हे लोक धर्मेंद्रला खोट्या प्रकरणात अडकवून जेलमध्ये पाठवतील.

सासरच्या लोकांना प्रेमविवाहाचा राग होता. म्हणूनच संशय माझ्या सासरच्या लोकांवर आहे. मी चिपाबाद पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि तक्रार दाखल केली पण आतापर्यंत पोलीस विभागाने कोणतीही योग्य कारवाई केलेली नाही असंही तरुणाने म्हटलं आहे. सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.  

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस