शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आनंदीबेन पटेल म्हणतात, मोदी अविवाहित असूनही महिलांच्या समस्या जाणतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 09:26 IST

राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या विधानानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या

भोपाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी अविवाहित असूनही त्यांना प्रसुतीवेळी आणि प्रसुतीनंतर महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव आहे, असं मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी म्हटलं आहे. आनंदीबेन यांच्या या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. पंतप्रधान मोदी विवाहित असूनही आनंदीबेन यांनी त्यांना अविवाहित म्हटल्यानं उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. आनंदीबेन मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील टिमरनीमध्ये अंगणवाडी केंद्रातील महिला आणि मुलांना संबोधित करत होत्या. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या विधानाची ऑडियो क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. 'तुमच्या मुलांसाठी, तुमच्यासाठी 'त्यांनी' लग्न केलं नाही, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. नरेंद्र भाईंनी लग्न केलेलं नसलं, तरीही प्रसुतीवेळी आणि प्रसुतीनंतर महिलांना आणि मुलांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, याची त्यांना कल्पना आहे,' असं आनंदीबेन यांनी म्हटलं आहे. हरदा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या आनंदीबेन यांनी एका उद्यानाचं लोकार्पणदेखील केलं. आरएसएसशी संबंधित विद्या भारती या संघटनेनं या उद्यानाची उभारणी केली आहे. पंतप्रधान मोदी अविवाहित असणारे असं विधान करणाऱ्या आनंदीबेन यांनी राज्यपालपदी नियुक्त झाल्यानंतर अनेकदा वादात सापडल्या आहेत. चित्रकूट दौऱ्यादरम्यान त्या भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. भाजपाला जास्तीतजास्त मतं कशी मिळतील आणि मोदींचं स्वप्न कसं साकार होईल, यावर आनंदीबेन पटेल बोलत होत्या. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर आनंदीबेन यांच्याकडे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र दोन वर्षांनंतर त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश