शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

मध्य प्रदेशातील जबलपूर उच्च न्यायालयाच्या इमारतीला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 19:56 IST

आगीमुळे न्यायालयाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला.

जबलपूर : मध्यप्रदेशातील जबलपूर येथील उच्च न्यायालयाच्या इमारतीला सोमवारी सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळेन्यायालयाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. दरम्यान,आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूर येथील उच्च न्यायालयाच्या इमारतीला सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग उच्च न्यायालयाच्या साउथ ब्‍लॉकच्या पहिल्या मजल्यावर लागली. आग लागल्याचे वृत्त समजताच न्यायालयातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरु झाली आणि परिसरात गोंधळ उडाला. दरम्यान, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. 

 

या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसून घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही जणांनी ही आग शॅार्ट सर्किटमुळे लागली असल्याचे सांगितले. मात्र, या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत इमारतीमधील जुने फर्निचर जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, डिसेंबर 2018 मध्ये उत्तर प्रदेशातील बलियामध्ये सुद्धा न्यायालयाला आग लागल्याची घटना घडली होती. बलियाच्या दिवाणी न्यायालयात आग लागली होती. या आगीत अनेक कायदेशीर कागदपत्रे जळून खाक झाली होती.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशfireआगCourtन्यायालय